महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

MH Assembly Budget Session 2022 : 'सत्ताधाऱ्यांकडून केवळ महनीय व्यक्तींवरच चर्चा', विनायक मेटेंची सत्ताधाऱ्यांवर टीका - विनायक मेटे राज्य सरकार टीका

राज्यपालांच्या अभिभाषणावर सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेत आक्षेप घेतल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी ( Vinayak Mete Critisized MVA Government ) मात्र राज्यपालांच्या भाषणाचे गोडवे गायले. विविध मुद्दे असताना सत्ताधाऱ्यांकडून केवळ महनीय व्यक्तींवर चर्चा केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

MH Assembly Budget Session 2022
MH Assembly Budget Session 2022

By

Published : Mar 7, 2022, 7:06 PM IST

मुंबई -राज्यपालांच्या अभिभाषणावर सत्ताधाऱ्यांनी विधान परिषदेत आक्षेप घेतल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी ( Vinayak Mete Critisized MVA Government ) मात्र राज्यपालांच्या भाषणाचे गोडवे गायले. राज्यपालांच्या भाषणात अनेक मुद्दे असताना, केवळ छत्रपती शिवाजी महाराज ( Shivaji Maharaj ) महात्मा जोतीबा फुले ( Jotiba Fule ), सावित्रीबाई फुले ( Sawitribai Fule ) यांच्यासारख्या महनीय व्यक्तींवरच सत्ताधाऱ्यांनी भाषणात भर दिल्याची टीका मेटे यांनी केली.

काय म्हणाले विनायक मेटे -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी अभिभाषण केले. राज्यापालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव अभिजीत वंजारी यांनी सोमवारी विधान परिषदेत चर्चेसाठी मांडला. सर्व पक्षीय सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला. सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांनी अधिवेशनापूर्वी महनीय व्यक्तींवर केलेल्या आक्षपार्ह विधानांवर आक्षेप घेत, सडकून टीका केली. तर विरोधकांकडून राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लोबोल केला.

भाजपचे घटकपक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे सत्ताधाऱ्यांवर घसरले. राज्यपालांनी अभिभाषणात अनेक महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. महाविकास आघाडी सरकारकडून केवळ छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महनीय व्यक्तींवर भर दिले आहे. महत्वाच्या पदावरील व्यक्तींनी बोलताना, तारतम्य बाळगायला हवे. परंतु, सत्ताधारी एकाच विषयावर जास्त बोलत आहेत, अशी टीका केली. एकीकडे शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या मेटेंनी दुसरीकडे राज्यपालांच्या विधानांचे अप्रत्यक्ष समर्थन केल्याने शिवप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.

हेही वाचा -Girish Mahajan Taken Nap in Session : माजी मंत्र्यांना विधानसभेत लागली डुलकी, शेलारांनी खुणावताच...पाहा VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details