महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Vinayak Mete accident चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात - विनायक मेटे अपघात

आज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर vinayak mete vehicle accident पनवेल जवळील बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे ज्येष्ठ नेते विनायक मेटे vinayak mete car accident यांचे अपघाती निधन झाले. यावेळी विनायक मेटे यांच्यासोबत त्यांचे सुरक्षारक्षक आणि चालक होते. मात्र विनायक मेटे यांना अपघातानंतर त्वरित vinayak mete accident मदत मिळाली नसल्याचे गाडी चालकाकडून सांगण्यात vinayak mete driver आले.

vinayak mete vehicle accident
विनायक मेटे वाहन अपघात

By

Published : Aug 14, 2022, 10:00 AM IST

Updated : Aug 14, 2022, 10:28 AM IST

मुंबईआज पहाटे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पनवेल vinayak mete vehicle accident जवळील बोगद्याजवळ शिवसंग्राम पक्षाचे ज्येष्ठ नेते विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाले. यावेळी विनायक मेटे यांच्यासोबत vinayak mete car accident त्यांचे सुरक्षारक्षक आणि चालक होते. मात्र विनायक मेटे vinayak mete driver यांना अपघातानंतर त्वरित मदत मिळाली नसल्याचे गाडी चालकाकडून सांगण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला हा आरोप रसायनी पोलीस स्टेशनकडून vinayak mete accident खोडून काढण्यात आला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

हेही वाचासंस्थाचालकाच्या मुलाकडून बलात्कार झाल्याने विद्यार्थिनी गर्भवती, गर्भपात करताना झाला मृत्यू

पोलिसांनी दिलेले अपघातचे कारणफोर्ड वाहन चालक एकनाथ कदम हे विनायक मेटे यांना घेऊन मुंबईच्या दिशेने दुसऱ्या लेनने जात होते. त्या दरम्यान कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व वाहन पुढे जाणाऱ्या अज्ञात वाहनाला ठोकर मारून अपघात घडला. अपघातात आमदार विनायक मेटे हे अत्यंत गंभीर जखमी झाल्याने त्यांना तात्काळ आयआरबी रुग्णवाहिकेने एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉ. धर्मांग यांनी तपासून मृत घोषित केले. बाॅडिगार्ड पोलीस हवालदार राम ढोबळे हे कारमध्ये अडकल्याने त्यांना कारमधून बाहेर काढून आयआरबी रुग्णवाहिकेने तात्काळ एमजीएम रुग्णालय कामोठे येथे उपचारासाठी नेण्यात आले. कार आयआरबी क्रेनच्या साहायाने रस्त्याचे बाजूला घेतली, असे महामार्ग पोलीस केंद्र, पळस्पे येथून माहिती मिळाली आहे.

अपघाताची चौकशी होणारशिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन Vinayak Mete Car accident झाले. या अपघाताची चौकशी केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात मेटे यांच्या कुटुंबाची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

विनायक मेटे यांच्या निधनावर प्रतिक्रिया मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील माडप बोगद्याजवळ मेटे यांच्या वाहनाला अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाले होते. पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांनी मोठा लढा उभारला होता. त्यांच्या निधनाने समाजाला मोठा हादरा बसला आहे. शिवसंग्रामचे नेते व माजी आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन झाल्याचे दुःखद वृत्त समजले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! आई-जगदंबा, मेटे कुटुंबीय व शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांना या दुःखातून सावरण्याची ताकद दे, अशी श्रद्धांजली खासदार अमोल कोल्हे यांनी वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis on Vinayak Mete death म्हणाले, की दिवसाची सुरुवात वाईट पद्धतीने झाली. या प्रकाराची चौकशी व्हावी असे निर्देश दिले आहेत. गरिबीतून वरती आलेला हा नेता होता. माझ्या अतिशय जवळचे सहकारी होते. मराठा समाजाच्या बैठकीसाठी मुंबईत येत होते. त्यांनी मला मेसेज केला होता. कधी न भरून निघणारी हानी आहे. शिवसंग्राम परिवाराला हा मोठा धक्का आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण Ashok Chavhan on Vinayak Mete death माजी आमदार विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या रूपात मराठा समाजाचे प्रश्न हिरीरीने मांडणारा एक नेता हरपला आहे. विधीमंडळात आम्ही अनेक वर्ष सहकारी होतो. त्यांचे अकाली निधन अविश्वसनीय व वेदनादायी आहे. विनायकराव मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली, काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वाहिली आहे.

हेही वाचाविनायक मेटे यांच्या वाहनाचा मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात उपचारादरम्यान मृत्यू

Last Updated : Aug 14, 2022, 10:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details