महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ramabai Ambedkar Viewing Gallery : चैत्यभूमी व्ह्युविंग गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव - Ramabai Viewing Gallery

दादर चौपाटी येथे गेल्या ९ फेब्रुवारी रोजी ‘व्ह्यूविंग गॅलरीचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले होते. ही गॅलरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला लागलेली असून, त्याला ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्यूविंग गॅलरी’ (Ramabai Ambedkar Viewing Gallery नाव देण्याचे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिलेत.

Ambedkar Viewing Gallery
Ambedkar Viewing Gallery

By

Published : Feb 13, 2022, 3:39 PM IST

मुंबई - दादर चौपाटी चैत्यभूमी (Dadar Chowpaty) येथे मुंबई महापालिकेने वह्यूविंग गॅलरी उभारली आहे. या गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव देण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) यांनी दिले आहेत. त्यानंतर महापालिकेतील सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी माता रमाबाई व्ह्यूविंग गॅलरी (Ramabai Viewing Gallery ) असे नाव देण्याचा प्रस्ताव पालिकेच्या जी-उत्तर विभाग कार्यालयाकडे दिला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर या गॅलरीला माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव दिले जाणार आहे.

माता रमाबाई आंबेडकर यांचे नाव
दादर चौपाटी येथे गेल्या ९ फेब्रुवारी रोजी ‘व्ह्यूविंग गॅलरीचे लोकार्पण राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. ही गॅलरी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चैत्यभूमीला लागून आहे. यासाठी या गॅलरीला ‘माता रमाबाई आंबेडकर स्मृती व्ह्यूविंग गॅलरी’ द्यावे असे निर्देश आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. एखाद्या वास्तूला नाव देताना रितसर प्रस्ताव पालिकेकडे यावा लागतो. त्याला प्रभाग समिती, स्थापत्य समिती व पालिका सभागृहाची मंजुरी घ्यावी लागते. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेतील सभागृह नेते व स्थानिक नगरसेविका विशाखा राऊत यांनी पालिकेच्या जी उत्तर विभागाकडे नामकरणाबाबत ११ फेब्रुवारीला पत्र दिले आहे. त्यानुसार नामकरण करण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रचलित पद्धतीनुसार प्रभाग समितीच्या मान्यतेनंतर लवकरच जाहीर कार्यक्रमादरम्यान अधिकृतपणे नामकरण केले जाईल, असे जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक वैशिष्ट्ये -
दादर व सभोवतीच्या परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा या डेक खाली असणाऱ्या पर्जन्य जलवाहिनीच्या पातमुखातून समुद्रात करण्यात येतो. "पावसाचे पाणी वाहून समुद्रात नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या पातमुखावर केवळ १० महिन्यांचा कालावधीत उभारण्यात आला आहे. या आकर्षक, भव्य आणि विलोभनीय 'व्ह्युविंग डेक'मुळे मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना एक अभिनव पर्यटन स्थळ उपलब्ध झाले आहे". डेकची उंची समुद्रापासून सुमारे दहा फूट आहे. डेकचे क्षेत्रफळ १० हजार चौरस फूट इतके आहे. डेकचे बांधकाम मार्च २०२१ मध्ये सुरू झाले होते व केवळ दहा महिन्यांच्या कालावधीत या डेकचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. डेकचे बांधकाम २६ पिलर्स वर करण्यात आलेले आहे. डेकवर अत्याधुनिक व ऊर्जा बचत करणाऱ्या 'एलईडी' दिव्यांची आकर्षक प्रकाशयोजना करण्यात आली. डेकवर एका वेळी ३०० व्यक्ती उभ्या राहू शकतात. डेकवर किमान १०० लोकांची बसण्याची व्यवस्था आहे. यासाठी सदर ठिकाणी २६ बाक ठेवण्यात आले आहेत. तसेच ८ ठिकाणी वैविध्यपूर्ण आकाराची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरण पूरकतेचा भाग म्हणून याठिकाणी विविध प्रकारची १३० झाडे लावण्यात आलेली आहेत.

हेही वाचा -Aaditya Thackeray : किरीट सोमैय्या यांच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे, म्हणाले...'आम्ही सगळीकडचा राडारोडा काढतोय'

ABOUT THE AUTHOR

...view details