मुंबई - मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना राबडीदेवीची उपमा दिली हे बरं ( Comparison Of Rashmi Thackeray With Rabdi Devi ) झालं, फडणवीस यांच्या पत्नीची उपमा दिली असती तर डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केलं ( Vidya Chavan Statement Against Amruta Fadnavis ) होतं. विद्या चव्हाण यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला असून, याबाबत विद्या चव्हाण यांच्यावर अमृता फडणवीस यांनी अब्रूनुकसानीचा दावा ठोकला ( Amrita Fadnavis Claims Loss Of Reputation ) आहे.
Amruta Fadnavis Vs Vidya Chavan : विद्या चव्हाण म्हणाल्या 'डान्सिंग डॉल', अमृता फडणवीसांनी ठोकला अब्रुनुकसानीचा दावा
रश्मी ठाकरे यांना एका भाजपच्या नेत्याने राबडी देवींची उपमा दिली ( Comparison Of Rashmi Thackeray With Rabdi Devi ) होती. त्यानंतर भाजप नेत्याच्या विरोधात एका टीव्ही चॅनलवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस यांना या वादात ओढले. बोलता बोलता त्यांनी अमृता फडणवीस यांना डान्सिंग डॉल ( Vidya Chavan Statement Against Amruta Fadnavis ) म्हटले. त्यामुळे चिडलेल्या अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकला ( Amrita Fadnavis Claims Loss Of Reputation ) आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिपणी करणाऱ्या जितेन गजारिया ( Police Action Against Jiten Gajaria ) यांच्यावर कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध नोंदवत अमृता फडणीस यांना त्या वादात ओढले होतं. रश्मी ठाकरेंना राबडी देवीची उपमा दिली हे बरं झालं. नाहीतर फडणवीस यांच्या पत्नीची उपमा दिली असती तर, डान्सिंग डॉल अशी प्रतिमा झाली असती असं विधान विद्या चव्हाण यांनी केलं होतं. विद्या चव्हाण यांच्या विधानानंतर राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. हे पाहता अमृता फडवणीस ह्या चांगला डान्स करतात म्हणून त्यांना आपण डान्सिंग डॉल असे म्हटले, असे विद्या चव्हाण म्हणाल्या आहेत. विद्या चव्हाण यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना अमृता फडणीस यांनी आता विद्या चव्हाण यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. आपल्या वकिलांमार्फत त्या पद्धतीची नोटीस त्यांनी विद्या चव्हाण यांना पाठवली आहे.
काय लिहिलं आहे नोटीसमध्ये!
या नोटिसीमध्ये अमृता फडणीस यांच्या वकिलांनी असे म्हटले आहे की, विद्या चव्हाण यांच्या विधानामुळे आमच्या अशिलाची बदनामी करण्यात आली आहे. तिच्या प्रतिष्ठेला मोठी हानी पोहोचली आहे. तथापि असं असूनही तुम्ही उपरोक्त बदनामीकारक विधान चुकीच्या हेतूने आणि आमच्या अशिलाच्या बदनामीच्या उद्देशाने केले आहे. या कारणास्तव त्यांना प्रचंड वेदना, मानसिक वेदना आणि लाजिरवाणे वाटले आहे. त्याबाबत त्यांची बदनामी झाली असून, आमचा अशिल म्हणतो की या अगोदर सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने बेजबाबदार आणि बदनामीकारक विधाने केली आहेत. ती खोटी व दिशाभूल करणारी होती.
विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी
यासाठी ही सूचना मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत तुम्ही केलेली उपरोक्त बदनामीकारक विधाने निराधार, आहेत आणि बिनशर्त मागे घेतली आहेत असे सांगून पत्रकार परिषद घेऊन आमच्या अशिल ची बिनशर्त माफी मागावी.