ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सुधारणा विधेयक 2021 मांडले. त्यावर चर्चा होऊन आवाजी मतदानाने संमत करण्यात आले.
Maharashtra Council Winter Session 2021 : विधान परिषद कामकाजाचे लाईव्ह अपडेट
18:37 December 24
महाराष्ट्र ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सुधारणा विधेयक 2021
17:40 December 24
शक्ती फौजदारी कायदा महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2021
काल गुरुवारी विधानसभेत शक्ती कायदा संमत झाला. आज गृहमंत्री दिलीप-वळसे-पाटील यांनी शक्ती विधेयक वरिष्ठ सभागृहात ठेवले आहे. विधेयकावर चर्चा सुरू असून लवकरच मतास टाकण्यात येणार आहे.
17:36 December 24
पुरवणी मागण्यांसाठीच्या तरतूदी - शंभूराजे देसाईंची माहिती
- कोरोनात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना मदतनिधी साठी 1 हजार कोटींची तरतूद
- एसटी महामंडळासाठी 5 हजार कोटींची तरतूद
- संजय गांधी योजना, निराधार योजना, श्रावणबाळ योजनेसाठी आठशे कोटींची तरतूद
- ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींकरिता 600 कोटींची तरतूद शहरीसाठी बाराशे कोटी
- पाणी पुरवठा योजनेच्या कर्जाच्या परतफेरीसाठी सहाशे कोटींची तरतूद
- रस्त्यांकरिता 500 कोटींची तरतूद
- भटक्या जाती-विमुक्तांच्या शिष्यवृत्तीसाठी 500 कोटींची तरतूद
15:36 December 24
पुरवणी मागण्यांवर चर्चा
सभागृहाचे कामकाज चालू झाल्यानंतर पुरवणी मागण्या सुरू आहेत. अनेक सदस्य पुरवणी मागण्या मांडत आहे.
15:28 December 24
कामकाजास सुरूवात
शिवसेना आमदार रामदास कदम यांनी मनसे नेते वैभव खेडेकर मारहाण प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे काही वेळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. आता पुन्हा कामकाजास सुरूवात झाली आहे.
15:02 December 24
कामकाज तहकूब
मनसे नेते वैभव खेडेकर मारहाण प्रकरणावर शिवसेना आमदार रामदास कदम आक्रमक झाले. त्यामुळे विधानसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकुब करण्यात आले आहे.
13:28 December 24
पुरवणी मागण्या
- आमदार सदाभाऊ खोत यांनी पुरवणी मागण्यात सहभाग घेतला
- आमदार अमोल मिटकरी यांनी पुरवणी मागण्या मांडल्या.
- आमदार जयंत पाटील यांनी पुरवणी मागणी मांडली
- यांच्यासह इतरही आमदार पुरवणी मागण्या मांडत आहेत
12:14 December 24
सभागृहात मंत्र्यांची अनुपस्थिती
पुरवणी मागण्या सुरू असताना मंत्र्यांची उपस्थिती बंधनकारक आहे. सबंधित मंत्र्याने किंवा राज्यमंत्र्याने या मागण्यांच्या वेळी उपस्थित रहावे लागते. मात्र मंत्र्यांची उपस्थिती नसल्याने विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली. सतत वरिष्ठ सभागृहाचा अपमान होत असल्याचे त्यांनी म्हटले. यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी मंत्र्यांना बोलवण्याच्या सूचना दिल्या.
12:08 December 24
पुरवणी मागण्यांवर चर्चा
सभागृहात पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू आहे. पुरवणी मागण्यांचा हा शेवटचा दिवस आहे. सदस्यांनी ठेवलेल्या मागण्यांना मंत्र्यांनी उत्तर देऊन त्यांचे समाधान करायचे आहे.
12:06 December 24
वार्षिक अहवाल सादर
सभागृहात विविध विद्यापीठाचा आणि मंडळांचा अहवाल सबंधित मंत्र्यांनी सादर केला.
12:01 December 24
अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही
काल गुरूवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. निर्णयाची माहिती संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांनी सभागृहात दिली. सोमवार आणि मंगळवार पर्यंत कामकाज होणार असून या काळात अंतिम आठवडा, शासकीय कामकाज आणि पुरवणी मागण्या, सत्तारूढ पक्षाचा प्रस्तावर सादर केला जाईल.
11:51 December 24
पंतप्रधान पीक विमा योजनेवर चर्चा
- आमदार प्रशांत परिचारक यांनी फळबागांना विमा मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली.
- शेतकऱ्यांना विमा मिळण्यास अनेक अडचणी येत आहेत. यासाठी नवीन निकष आणि धोरण आखण्याची गरज असल्याचे मत कृषीमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले.
10:31 December 24
Vidhanparishad live page
मुंबई : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. सुरुवातील प्रश्नोत्तराचा तास पार पडला असून पुढील कामकाज सुरू आहे.
TAGGED:
Vidhanparishad live page