महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लग्न वाचवण्याकरिता पीडित महिलेचा आरोपीवर बलात्काराचा आरोप; मुंबई उच्च न्यायालयातून आरोपीला जामीन मंजूर - Mumbai High court granted bail to rape Accused

मुंबई उच्च न्यायालयाने 20 महिन्यानंतर बलात्कारातील आरोपीला जामीन मंजूर Rape accused granted bail केला आहे. प्रकरणातील पीडित महिलेने उच्च न्यायालयात सांगितले की, आरोपी आणि तिच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध Extramarital affair होते. हे पतीला माहीत झाल्यामुळे लग्न वाचवण्याकरिता तिने आरोपीवर बलात्काराचा आरोप Allegation of rape to save marriage केला होता. पीडित महिलेने उच्च न्यायालयात जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने आरोपीची जामीनावर सुटका केली आहे.

मुंबई उच्च न्यायालयातून आरोपीला जामीन मंजूर
मुंबई उच्च न्यायालयातून आरोपीला जामीन मंजूर

By

Published : Sep 16, 2022, 3:06 PM IST

मुंबई :मुंबई उच्च न्यायालयाने 20 महिन्यानंतर बलात्कारातील आरोपीला जामीन मंजूर Rape accused granted bail केला आहे. प्रकरणातील पीडित महिलेने उच्च न्यायालयात सांगितले की, आरोपी आणि तिच्यात विवाहबाह्य प्रेमसंबंध Extramarital affair होते. हे पतीला माहीत झाल्यामुळे लग्न वाचवण्याकरिता तिने आरोपीवर बलात्काराचा आरोप Allegation of rape to save marriage केला होता. पीडित महिलेने उच्च न्यायालयात जबाब नोंदवल्यानंतर न्यायालयाने आरोपीची जामीनावर सुटका केली आहे. Mumbai High court granted bail to rape accused


स्वत:ला वाचविण्यासाठी प्रियकराला फसविले -पीडित विवाहित महिलेने कांदिवली पोलीस स्टेशनमध्ये 27 जानेवारी 2021 रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपी अजित दसाना विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी पीडितीने तक्रारीत असा दावा केला होता की, ही घटना 20 जानेवारी रोजी संध्याकाळी उशिरा घडली, जेव्हा ती तिच्या पतीच्या दुकानातून आरोपीच्या दुचाकीवरून घरी परतत होती. पीडित महिलेने दावा केला घरी येत असताना वाटेत आरोपीने वाहन रस्त्यापासून दूर वळवले आणि एका निर्जन ठिकाणी थांबले. जेथे त्याने तिच्यावर जबरदस्ती केली. घरी पोहोचल्यावर तिच्या पतीने उशीर झाल्याबद्दल विचारणा केली तेव्हा तिने सांगितले की, आरोपी अजित दसानाला त्याच्या बाईकमध्ये पेट्रोल भरायचे होते म्हणून उशीर झाले. एका आठवड्यानंतर पीडित महिलेने तिच्या पतीला सर्व प्रकारची माहिती दिली आणि सांगितले की, अजितदासने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर 28 जानेवारी रोजी आरोपीला अटक करण्यात आली होती.

पतीने चौकशी सुरू केल्याने घाबरली पत्नी -पीडित महिलेने याचिकेत तिने उघड केले की, 20 जानेवारी रोजी रात्री 11.30 च्या सुमारास तिचा पती काम संपल्यानंतर त्याने स्वयंपाकघरातील सामानाचा टेम्पो भरला आणि तिला बसण्यासाठी जागा नसल्याने त्याने तिला आरोपीसोबत घरी जाण्यास सांगितले. पीडित महिलेने कबूल केले की, ती घरी पोहोचण्यापूर्वी दोघांनी काही वेळ एकांतात घालवला आणि उशीर होण्याचे कारण म्हणून तिने बाईक टँक अप करण्याचे निमित्त केले होते. तिच्या याचिकेत पुढे म्हटले आहे की, काही दिवसांनंतर तिच्या पतीने आरोपींसोबतच्या तिच्या संबंधांबद्दल तिची चौकशी सुरू केली होती. त्यांच्याशी प्रेमसंबंध असल्याच्या गप्पा मारल्या होत्या. यामुळे ती खूप घाबरली आणि तिचे लग्न वाचवण्याच्या एकमेव उद्देशाने आरोपी आणि तिचे कोणतेही विवाहबाह्य संबंध नसल्याचे तिच्या पतीशी खोटे बोलले आणि 20 फेब्रुवारी 2021 रोजी ती घरी उशिरा पोहोचली कारण त्याने तिच्यावर बलात्कार केला असं तक्रारी नमूद केले होते. अर्ज वाचून असे दिसून येते की तक्रारदाराने लग्न वाचवण्यासाठी पती आणि पोलिस अधिकाऱ्यांशी खोटे बोलून अर्जदारावर आरोप केले असे न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकल खंडपीठाने जामीन मंजूर करताना निरीक्षण नोंदवले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details