मुंबई -राज्यात महविकास आघाडी सरकारला २ वर्षे पूर्ण झाली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारीत 'वीर सावरकर, द मॅन कुड ह्याव प्रिव्हेंटेड पार्टिशन' ( Veer Savarkar book publication ) या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील सावरकर स्मारकात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( book publication by devendra fadnavis ) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जीवनाचा संदर्भ घेत फडणवीस यांनी ठाकरे सरकार, हिंदुत्व, २६/११ आतंकी हल्ला, मतांसाठी ममता बॅनर्जी यांची लाचारी यावर सडकून टीका करत मोदी सरकारची प्रशंसा केली.
हेही वाचा -डोंबिवलीतील 'त्या' रुग्णाची मुंबईत होणार जिनोम सिक्वेन्सिंग चाचणी, पुढच्या आठवड्यात येईल अहवाल
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करताना फडणवीस यांनी सावरकरांच्या विविध व्यक्तिमत्त्वांचा उल्लेख केला. सावरकरांचे व्यक्तिमत्त्व बहुअंगी असून त्यांच्याबद्दल एका कार्यक्रमात बोलणे अशक्य आहे, असे सांगत सावरकर हे विद्यापीठ आहे. त्यांच्या विचारातून शिक्षित होता येते. कालपेक्षाही आज सावरकरांचे विचार आम्हाला मोलाचे वाटतात, असे फडणवीस म्हणाले.
भारताने जेव्हा जेव्हा बोटचेपी भूमिका घेतली तेव्हा तेव्हा आत्मविश्वास तर गमावला, भूभाग देखील गमावला. आजही आमच्या मोठ्या भूभागावर चीनचा कब्जा आहे.
पण, आज चीन आपल्याला घाबरत आहे. जर आम्ही हिंदी चिनी भाई भाई, असे धोरण ठेवले असते तर हे शक्य नसते. असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनविषयी स्वीकारलेल्या धोरणांची देवेंद्र फडणवीस यांनी याप्रसंगी स्तुती केली. त्याचप्रमाणे जी नीती सावरकरांना अपेक्षित होती तेच मोदी करत आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
आतंकवाद्यांना मोदींकडून सडेतोड उत्तर