मुंबई- देशात जमावाकडून एखाद्याची हत्या करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा प्रकारे मॉब लिंचिंगमुळे होत असलेल्या हत्या या केवळ विशिष्ठ धर्माला आणि जातीला लक्ष्य करून केल्या जात आहेत, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी दादर येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
मॉबलिंचिंग विरोधात वंचित बहुजन आघाडीचा भाजप कार्यालयावर मोर्चा - हत्या
मॉबलिंचिंग प्रकारातून होणाऱ्या हत्या रोखाव्या, नाही तर सरकारने आम्हाला तरी मारावे, असे आवाहन या आंदोलकांनी यावेळी सरकारला केले. यामोर्चावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
वंचित बहुजन आघाडीचा भाजप कार्यालयावर मोर्चा
रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मॉबलिंचिंग प्रकारातून होणाऱ्या हत्या रोखाव्या, नाही तर सरकारने आम्हाला तरी मारावे, असे आवाहन या आंदोलकांनी यावेळी सरकारला केले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.