मुंबई -महाराष्ट्रातील पहिलीपासूनचे सर्व वर्ग 1 डिसेंबरपासून नियम-अटींसह सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, तत्पूर्वीच राज्यात व विशेषत: शहरी भागात ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंचा प्रादुर्भाव वाढला व मुंबई-पुण्यासह शहरी भागातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत पुन्हा बंद ठेवण्यात आल्या. आता 15 डिसेंबरला मुंबईतीलशाळा सुरू होणार का, याबाबत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी (EXCLUSIVE interview of school education minister Varsha Gaikwad) महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
प्रश्न - कोरोनाचा अतिशय कठीण काळ होता शाळांसाठी आणि मुलांसाठीही. अजूनही ऑनलाइन वर्ग सुरू आहेत. मुंबईमध्ये १५ डिसेंबरनंतरशाळा सुरूहोणार आहेत, असं आपण म्हणतोय मात्र नेमकी परिस्थिती काय आहे ?
वर्षा गायकवाड - कोरोनाचा काळ प्रत्येकासाठी व आमच्यासाठीही आव्हानात्मक काळ होता. (Varsha Gaikwad on School Reopen) कारण मुलांना शिक्षण कसे द्यायचे हा प्रश्न उभा होता. कोरोनामुळे संपूर्ण लॉकडाऊन लागू होता त्यामुळे मुलांना शाळेमध्ये बोलवू शकत नव्हतो. अशा परिस्थितीमध्ये मुलांना शिक्षण देत असताना आपण ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणी कनेक्टिव्हिटी व नेटवर्कचा प्रॉब्लेम समोर आला. अशा ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने शिक्षणाच्या सूचना देण्यात आल्या. गुगलचा व व्हॉट्सअॅपचा कसा वापर केला पाहिजे, याचा आढावा घेण्यात आला. मला सांगायला आवडेल की, शिक्षकांनी आणि पालकांनी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आणि शिक्षकांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले गेले. शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्या आहेत. शहरामध्ये शाळा सुरू करण्याबाबत महानगरपालिकांच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करत आहोत.
प्रश्न - दहावी, बारावीच्या परीक्षा आणि प्रवेश यासंदर्भात निर्णय घेणे किती आव्हानात्मक होते?
वर्षा गायकवाड -दहावीनंतरच्या प्रवेशासंदर्भात दहावीचा रिझल्ट सर्वात मोठा प्रश्न होता तो कसा केला पाहिजे . मात्र त्यावरही अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही काम करू शकलो. मुलांच्या परीक्षा रद्द करून त्यांचे अतर्गत मूल्य़मापन करण्यात आले. शिक्षक असतील. मुख्याध्यापक अशा सर्वांनीच खूप सहकार्य केले. ऑनलाइन पद्धतीने त्याचबरोबर ऑफलाईन परीक्षा झालेल्या मुलांसाठी पेपर तपासण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये, कुठे शाळेमध्ये शिक्षकांनी तपासण्याचे काम केलं.
प्रश्न - डिजिटल अटेंडन्स हा काय नवीन प्रयोग करता आहात, याबद्दल काय सांगता येईल?
वर्षा गायकवाड - शिक्षण विभागाने आता महा ॲप तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची डिजिटल हजेरी लावली जाणार आहे. यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांची अचूक उपस्थिती आपल्याला कळणार आहे. याचा फायदा मुलांच्या शाळा गळतीची नेमकी संख्या करण्यासाठी होणार आहे. विशेष म्हणजे मुलींची संख्या कमी होते का आणि जर होत असेल तर त्याचा पाठपुरावा करता येणे यामुळे शक्य होणार आहे.
प्रश्न - काही शाळांमध्ये पट वाढवण्यासाठी बोगस विद्यार्थी दाखवले जातात, त्यासाठी हे ॲप किती उपयोगी ठरेल?