महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Covid Restrictions Will Be Relaxed : महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध होणार शिथील, संक्रमणही आले आटोक्यात, पण.. - महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावलेले निर्बंध

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ( Covid Spread Maharashtra ) विविध प्रकारचे निर्बंध राज्य सरकारने लादले ( Covid Restrictions In Maharashtra ) होते. आता कोरोनाचे संक्रमण आटोक्यात येत असल्याने निर्बंध शिथिल होणार ( Covid Restrictions Will Be Relaxed ) आहेत. तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

अजित पवार
अजित पवार

By

Published : Feb 17, 2022, 4:54 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा संक्रमण ( Covid Spread Maharashtra ) आटोक्यात आले आहे. केंद्रानेही निर्बंध ( Covid Restrictions In Maharashtra ) शिथिल करण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहे. महाराष्ट्रात देखील लवकरच निर्बंध शिथील केले जातील ( Covid Restrictions Will Be Relaxed ) , असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मुंबईत दिले.

महाराष्ट्रात कोरोनाचे निर्बंध होणार शिथील, संक्रमणही आले आटोक्यात, पण..

राज्यातील निर्बंध शिथील

देशासह राज्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आला आहे. दिवसागणिक रुग्ण संख्या घटत आहे. हे सातत्य कायम राहिले तर, राज्यातील निर्बंध शिथील करण्याचा विचार केला जाईल. केंद्राने बुधवारी याबाबतचा आढावा घेतला. दरम्यान, सर्व राज्यांनी कोरोनाचे निर्बंध संपवण्याच्या सुचना पत्राद्वारे केल्या आहेत. महाराष्ट्रातील निर्बंध देखील लवकरच शिथील होतील, असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मात्र, निर्बंध हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री ठाकरे घेतील, असे पवार म्हणाले. 15 ते 18 वयोगटातील लसीकरणावर भर दिला आहे. येत्या अधिवेशना वेळी दोन डोस घेतले असतील, तरच परवानगी मिळेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

विधानसभा अध्यक्ष निवड

विधानसभा अध्यक्षपदाची निवड रखडली आहे. कॉंग्रेसचे नेते या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अध्यक्ष पदाची निवड व्हावी, असे पवार यांनी सांगितले. अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन केले जाते, त्यावेळी मतमतांतर असतात. मुख्यमंत्री सर्वांचे म्हणणे जाणून घेत, त्यातून सुवर्णमध्य काढतात. दोन वर्षात असाच कारभार केलेला आहे असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.

जबाबदारी ओळखून वागावे

राज्यात शिवसेना- भाजप एकमेकांची उणीधूणी काढत आहेत. अजित पवार यांनी पत्रकारांनी छेडले असता, वसंतदादा चव्हाण काळापासून शरद पवार यांच्या कार्यकाळात असे प्रकार होत नव्हते. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वागायल हवे, असे पवार सांगत यांनी कानपिचक्या दिल्या.

केसीआर 'या'साठी येत असतील

राज्याच्या सीमा भागाला लागून असलेल्या आजूबाजूच्या राज्यांचे विविध प्रश्न असतात. अशा वेळी दोन्ही राज्यांच्या संमतीने निर्णय घ्यावे लागतात. देवाण- घेवाण, महत्वाच्या दृष्टीकोनातील आदी विषय असतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. राव हे देखील याच कारणासाठी येत असावेत, अशी माहिती प्रसारमाध्यमांतून माहिती मिळाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details