मुंबई: कोरोना काळात जीव धोक्यात घालून राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखणाऱ्या राज्यातील पोलिसांमध्ये पोलीस बोनस (maharashtra police bonus) न दिल्यामुळे नाराजीचा सूर आहे. त्यासाठी राज्यातील अनेक पोलिसांच्या संघटना सरसावल्या आहेत. (Police Bonus Demand) सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळत असताना पोलिसांना मात्र गेली अनेक वर्षे बोनस मिळत नाही हा अन्याय असून पोलिसांना देखील बोनस मिळावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
Police Bonus Demand: दिवाळी बोनसासाठी विविध पोलीस संघटनांची सरकारकडे मागणी - पोलीस बोनस
कोरोना काळात जीव धोक्यात घालून राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखणाऱ्या राज्यातील पोलिसांमध्ये पोलीस बोनस (maharashtra police bonus) न दिल्यामुळे नाराजीचा सूर आहे. त्यासाठी राज्यातील अनेक पोलिसांच्या संघटना सरसावल्या आहेत. (Police Bonus Demand)
![Police Bonus Demand: दिवाळी बोनसासाठी विविध पोलीस संघटनांची सरकारकडे मागणी maharashtra police](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-16667419-344-16667419-1665993391050.jpg)
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची देखील मागणी: महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे (maharashtra police boys) संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पोलीसांना दिवाळी बोनस मिळावा अशी मागणी केली आहे. राहुल दुबाले म्हणाले, तुम्ही पोलिसांचे प्रत्येक हट्ट पुरविले. आता विनंती आहे की पोलिसांना दिवाळी बोनस द्या. आजपर्यंत दिला नाही पण आज आपलं सरकार आहे. पोलिसांना अग्रीम १० हजार २०० दिला जातो. पण नंतर तो पोलिसांच्या पगारातून कापला जातो. तुम्हीच आता बोनस देऊन पोलिसांची दिवाळी गोड करू शकता.
धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आर.आर. चव्हाण या पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पोलिसांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याची मागणी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय अशा विविध कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.