मुंबई -आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेसला अच्छे दिन आले असून विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांचे इनकमिंग सुरू झाले आहे. आज नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज टिळक भवन येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने नाशिक व रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष संघटना बळकट होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्यातील या नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश -
टिळक भवन येथे आमदार हिरामन खोसकर यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे माजी सभापती भाजपाचे संपतराव काळे, सरपंच बाळू वाजे, रतन बांबळे, राजाराम भोसले, ज्ञानेश्वर भोसले, दत्तू वाजे, सदाशिव काळे, विनायक काळे, पांडुरंग शिंदे, भाजपा युवा मोर्चाचे निलेश कडू, तुकाराम सहाणे, मधूकर सहाणे, त्र्यंबक सहाणे, रमेश जाधव, देवराम नाठे, जयराम धांडे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.