महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा - भीमा कोरेगाव प्रकरण

भीमा-कोरेगाव आणि अर्बन नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले तेलगू कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.

Varavara Rao
वरवरा राव

By

Published : Sep 6, 2021, 4:11 PM IST

मुंबई - भीमा-कोरेगाव आणि अर्बन नक्षलवाद प्रकरणात आरोपी असलेले तेलगू कवी वरवरा राव यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. वरवरा राव हे सध्या वैद्यकीय जामिनावर आहेत. त्यांना 25 सप्टेंबर 2021 पर्यंत आत्मसमर्पण करण्याची गरज नाही, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

हेही वाचा -फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्ला आरोपी नाहीत - राज्य सरकार

  • 25 सप्टेंबरपर्यंत आत्मसमर्पण करण्याची गरज नाही - न्यायालय

न्यायमूर्ती शिंदे आणि न्यायमूर्ती जामदार यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी करण्यात आली. वरवरा राव हे सध्या वैद्यकीय जामिनावर आहेत. जामिनाची अट शिथिल करत जेणेकरून वरवरा राव यांना मुंबई सोडून हैदराबाद येथे घरी राहता येऊ शकेल, अशा संदर्भात मागणी याचिकेत वरवरा राव यांनी केली होती.

दरम्यान, भीमा-कोरेगाव हिंसाचार, शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोप निश्चितीच्या प्रक्रियेला न्यायालयाने सुरुवात केली आहे.

हेही वाचा -करुणा मुंडे प्रकरण : वाहनात सापडलेल्या पिस्तूल प्रकरणी चालकावर गुन्हा दाखल

  • कोण आहेत वरवरा राव?

१ जानेवारी २०१८ रोजी भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्या दरम्यान अनेक वाहनेही जाळली गेली. वरवरा राव हे तेलुगू डाव्या विचारसरणीचे कवी आणि मानवाधिकार कार्यकर्ते आहेत. ते त्यांच्या क्रांतीकारक कवितांसाठी ओळखले जातात. ते तेलुगू साहित्याचे प्रख्यात मार्क्सवादी समिक्षक मानले जातात. राव अनेक दशकांपासून अनेक विद्यार्थ्यांना या विषयावर शिकवत आहेत. राव हे वीरसमचे (क्रांतिकारक लेखक संघटना) संस्थापक सदस्य देखील आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details