मुंबई -बुली बाई प्रकरणात आरोपी असलेल्या तिघांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मुख्य आरोपींनी विद्यार्थी असलेल्या आरोपींच्या अजाणतेपणानेचा वापर करून घेतला. वांद्रे न्यायालयाने 12 एप्रिलला हा जामीन दिला असून याबाबतचा सविस्तर आदेश न्यायालयाकडून मंगळवारी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
न्यायालयाकडून 'बुली बाई' अॅप प्रकरणात तिघांना जामीन मंजूर - मुंबई बुली बाई केस बातमी
या प्रकरणात विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक अग्रवाल यांच्या अजाणतेचा वापर या केला आहे. जमीन देणाऱ्या तिन्ही आरोपीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यांना तुरुंगात ठेवल्यास त्यांच्या भविष्यावर याचा परिणाम होईल. त्यांचं वय लक्षात घेता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
'या' तिघांचा झाला जामीन मंजूर -विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक अग्रवाल यांचा जामीन मंजूर केला असून या प्रकरणात ओंकारेश्वर ठाकूर आणि नीरज सिंह आणि नीरज बिष्णोई यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. यासोबतच जामीनावर सुटलेल्या आरोपींच्या पालकाने मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवून या प्रकरणात त्यांचे समुपदेशन करावे, सोशल मीडियाचा वापर करत असताना चुकीच्या गोष्टीपासून पाल्य लांब राहील याबाबत दक्षता देखील पालकांनी घ्यावी असा सल्लाही न्यायालयाने जामीन देताना दिला आहे.
'या' कारणाने जामीन केला मंजूर-ओंकारेश्वर ठाकूर आणि नीरज सिंह आणि नीरज बिष्णोई हे या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. त्यांच्याकडून या ॲपची निर्मिती करण्यात आली. तसेच या ॲप वर संवेदनशील मजकूर टाकण्याचे काम आहे त्यांच्याकडूनच करण्यात आले असल्याचा न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. हे तिन्ही आरोपी सज्ञान असून, आपण काय करतो याची पूर्ण माहिती आरोपींना होती. या प्रकरणात विशाल कुमार झा, श्वेता सिंह आणि मयंक अग्रवाल यांच्या अजाणतेचा वापर या केला आहे. जमीन देणाऱ्या तिन्ही आरोपीच्या परीक्षा जवळ आल्या आहेत. त्यांना तुरुंगात ठेवल्यास त्यांच्या भविष्यावर याचा परिणाम होईल. त्यांचं वय लक्षात घेता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.