मुंबई -नवे कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकरी गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला सर्व स्थरातून पाठिंबा मिळत असून, वंचित बहुजन आघाडीने देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. येत्या 17 डिसेंबरला राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती प्रकाश आंबेंडकर यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वंचितचा पाठिंबा, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ गुरुवारी राज्यभरात करणार आंदोलन
नवे कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी शेतकरी गेल्या 20 दिवसांपासून दिल्लीमध्ये आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला सर्व स्थरातून पाठिंबा मिळत असून, वंचित बहुजन आघाडीने देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. गुरुवारी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ वंचितच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
केंद्राने नवीन कृषी कायदे रद्द करावेत
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही 17 डिसेंबरला गुरुवारी आंदोलन करणार आहोत. किमान हमीभावाचा जो कायदा आहे, त्यात महाराष्ट्र सरकारने दुरुस्ती करावी, एका राज्याने पुढाकार घेतल्यास इतर राज्य देखील या कायद्यात दुरुस्ती करतील. शेतकऱ्यांना केवळ शब्दाने पाठिंबा देऊन चालणार नाही, तर कृतीने पाठिंबा द्यावा लागेल. यासाठी आम्ही गुरुवारी आंदोलन करणार आहोत. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. तसेच केंद्राने नवीन कृषी कायदे त्वरित रद्द करावेत अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.