महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दक्षिण मध्य मुंबईत बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार संजय भोसलेंचे शक्तिप्रदर्शन - Loksabha

बहुजन वंचित आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील लोकसभा उमेदवार संजय सुशील भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी दुचाकी रॅली काढण्यात आली.

संजय सुशील भोसले

By

Published : Apr 8, 2019, 6:21 PM IST

मुंबई - उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असल्याने कार्यकर्ते जमा करुन उमेदवार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज बहुजन वंचित आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील लोकसभा उमेदवार संजय सुशील भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले.

संजय भोसलेंचे शक्तिप्रदर्शन


पांजारपोळ चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन दुचाकी रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देण्यात येत होत्या. बहुजन वंचित आघाडीचे फलक हातात घेऊन कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details