मुंबई- वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटना यांच्यावतीने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दादर टी टी येथे धरणे आंदोलन करण्यात येत आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर या आंदोलनाला उपस्थित आहेत.
आर्थिक मंदीवरून लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व दुरुस्तीचा घाट - प्रकाश आंबेडकर
आर्थिक दृष्टीकोनातून हा देश पूर्णपणे खोलात गेला आहे. वर्षाला सरकारला चालवायला लागणारा खर्चही अजून जमलेला नाही. हे सर्व लपवण्यासाठी कलम 370 चा मुद्दा पुढे केला. मात्र, त्यानेही काही झाले नाही. त्यानंतर एनआरसी, सीएए आणि आता पॉप्युलेशन कायद्याचा मुद्दा पुढे केला असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आज नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीसह इतर संघटनांनी मुंबईत धरणे आंदोलन सुरू केले आहे.