महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लॉकडाऊन उठवण्यासह सार्वजनिक सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचितचे राज्यव्यापी 'डफली बजाव'..

'सार्वजनिक वाहतूक, लहान दुकाने वगैरे बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते, सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये. सक्तीचे लॉकडाउन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा'. या मागणीसह वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी नागपुरातून या आंदोलनाला सुरूवात केली.

डफली बजाव आंदोलन
डफली बजाव आंदोलन

By

Published : Aug 12, 2020, 7:45 PM IST

मुंबई - सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करा, जिल्ह्याबाहेरील वाहतुकीला परवानगी द्या, ठिक-ठिकाणी असलेले लॉकडाऊन हटवा या मागणीसह आज वंचित बहूजन आघाडीने राज्यव्यापी 'डफली बजाव आंदोलन' केले. या आंदोलनाला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला असून अनेक नागरिकांनी यात सहभाग घेतला.

गेल्या चार महिन्यांपासून ऑफिस, दुकाने, हॉटेल, मार्केट्स इत्यादी गोष्टी बंद असल्यामुळे लोकांचा आपापसांतील संपर्क कमी झाला आहे. महाराष्ट्रातील तज्ञ मंडळींनी कोरोनाच्या प्रसाराचा अभ्यास केल्यानंतर, कोरोनाविरोधात लढण्याची क्षमता 80 टक्के नागरिकांमध्ये असल्याचे सांगितले आहे. यामुळे राज्यातील लॉकडाऊन हटवण्यासह वाहतूक सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी शहरातील 11 बस डेपो आणि एसटी डेपोंबाहेर आंदोलन करण्यात आले. सोबतच मागण्या त्वरित मान्य न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

'सार्वजनिक वाहतूक, लहान दुकाने वगैरे बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते,सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करू नये. सक्तीचे लॉकडाउन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा'. या मागणीसह वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी नागपुरातून या आंदोलनाला सुरूवात केली.

ठाणे - कोरोनाला अटकाव घालण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला असला तरी यामुळे गोरगरीबांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने तत्काळ लॉकडाऊन हटवावा यासह बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी खोपट एसटी स्थानकासमोर आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मनाई आदेश झुगारुन हे आंदोलन करण्यात आल्याने 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

यावेळी ठाणे शहरात टीएमटीच्या बसगाड्या सुरु करा, पश्चिम, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात जाण्यासाठी एसटी बससेवा सुरु करा, ई-पास पद्धती बंद करावी, असंघटीत कामगारांना अर्थसहाय्य द्या इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाला राजाभाऊ चव्हाणांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -ठाकरे सरकारचा कोकणी माणसांवर कसला राग?

मनमाड (नाशिक) - मनमाड बसस्थानकावर आज वंचित बहुजन आघाडीचे नेते राजेंद्र पगारे यांच्या नेतृत्वाखाली 'हे' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात डफली वाजवत राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राजेंद्र पगारे, संतोष भोसले, कैलास गोसावी, आम्रपाली निकम यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकार विरोधात आगपाखड केली. यानंतर सर्कल अधिकारी कैलास चौधरी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात यशवंत बागुल, कैलास शिंदे, कादीर शेख, उमेश भालेराव, बाळू मोरे, वैशाली पवार, पिंटू शिरूड, अनिल सोपे, बप्पी त्रिभुवन, फरिदा सयद, सुरेश जगताप, रोहीत सोनवणे यांच्यासह वंचीत बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पंढरपूर (सोलापूर) - आज दुपारी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळयासमोर आंदोलन करण्यात आले. पंढरपूर भारिपचे शहर अध्यक्ष सागर गायकवाड यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले असून मागील चार महिन्यात नागरिकांना सहन करावा लागणाऱ्या त्रासाकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.

हिंगोली - कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याचे कंबरडे मोडले आहे. यातच जिल्हाधिकाऱ्यांनी गोर गरिबांचा विचार न करता ६ ते १९ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लावले आहे. यामुळे अनेक घरांचा रोजगार बुडला असून नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठीच हिंगोली जिल्ह्यात 'डफली बजाव आंदोलन' करण्यात आले. यावेळी डफली वाजवत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनाला रवी वाढे, वसिम देशमुख, ज्योतीपाल रणवीर आदींसह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

हेही वाचा -देशात कौटुंबिक हिंसाचारात 86 टक्के वाढ; पण लॉकडाऊनमुळे दाखल झालेल्या एवढ्याच तक्रारी

मीरा भाईंदर (ठाणे) - 'सरकार म्हणतंय रोग्याशी नाही रोगाशी लढायचं आहे, पण हे सरकार रोगाशी नाही तर रोग्यांशी लढत आहे. रुग्णांना वाढीव बील देण्यात येत आहे. तसेच वीज बिलांबात सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे सरकार आणि स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक सेवा सुरू करावी. या मागणीसाठी भाईंदर पश्चिमच्या एसटी आगाराबाहेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी 'डफली बजाव आंदोलन' केले.

या आंदोलनाला महेंद्र कांबळे, उमेश शिंदे, महेंद्र चाफे, महिला अध्यक्ष अश्विनी कांबळे, उत्तम भगत, सलीम खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड (पुणे) - लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून शहरातील आणि जिल्ह्याबाहेरील एसटी वाहतूक बंद आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे लक्षवेधत शहरातील मुख्य बसस्थानक वल्लभनगर येथेही आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -पार्थ पवार इमॅच्युअर.. त्याच्या विधानाला कवडीचीही किंमत नाही : शरद पवार

अमरावती - अमरावतीच्या मध्यवर्ती बसस्थानकासमोर वंचितने जोरदार आंदोलन केले. यावेळी कोरोनामुळे देशात आणि राज्यात मागील चार महिन्यांपासून लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे, छोट्या-मोठ्या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या मजूरावर उपासमारीची वेळ आल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

चिमूर (चंद्रपूर) - राज्यातील ८०% जनतेने कोरोना विरूद्ध लढण्याची क्षमता सिद्ध केली. यामुळे राज्यातील सर्व नागरिकांवर निर्बंध लादणे चुकीचे असून यामुळे अनेक नागरिकांवर बेरोजगारी आणि उपासमारिची वेळ आली आहे. याकडे लक्षवेधत शहरात आंदोलन करण्यात आले असून उप विभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात तालुका अध्यक्ष स्नेहदिप खोब्रागडे, श्रीदास राऊत, प्रवीण गजभिये, वासुदेव गायकवाड, बालाजी मेश्राम, रामदास राऊत, शालीक थुल, मोरेश्वर रामटेके, भागवत बोरकर, शैलेश गायकवाड, ज्ञानेश्वर नागदेवते, शुभम मंडपे, भाग्यवान नंदेश्वर, विनोद सोरदे, अ‌ॅड. एस. जी. श्रीरामे, निलकंठ शेंडे, सिद्धार्थ चहांदे, राजु घोनमोडे, दिगांबर बोरकर इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष: एक शाळा अशीही जिथे मागील ४ वर्षांपासून दिले जातात ऑनलाइन शिक्षणाचे धडे..

ABOUT THE AUTHOR

...view details