महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 12, 2021, 3:11 AM IST

ETV Bharat / city

मुंबईत आज, उद्या असे दोन दिवस लसीकरण बंद

कोरोना विषाणू प्रतिबंध लसीकरण मोहिमेंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (१२ ऑगस्ट) आणि शुक्रवारी 13 ऑगस्ट 2021 असे दोन दिवस लसीकरण बंद राहणार, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

मुंबई - कोरोना विषाणू प्रतिबंध लसीकरण मोहिमेंतर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (१२ ऑगस्ट) आणि शुक्रवारी 13 ऑगस्ट 2021 असे दोन दिवस लसीकरण बंद राहणार, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा -अपात्र १२ नगरसेवकांकडून मानधन परत करण्यास टाळाटाळ, संपत्तीवर टाच आणण्याची मागणी

पुन्हा लसीचा तुटवडा -

मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. मुंबईत लोकसंख्या जास्त असल्याने दिवसाला 50 ते 60 हजार, तर कधी कधी सवा लाखांपर्यंत लसीकरण झाले आहे. लसीकरणाला प्रचंड पाठिंबा मिळत असल्याने लसीचा तुटवडा होत आहे. लसीचा साठा मिळाल्यावर काही दिवस लसीकरण सुरू राहते. पुन्हा लसीचा तुटवडा जाणवू लागल्यावर लसीकरण बंद ठेवावे लागत आहे.

14 ऑगस्टपासून लसीकरण -

लशींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, 12 ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत लससाठा प्राप्त होणार असून त्याचे वितरण शुक्रवार दिनांक 13 ऑगस्ट 2021 रोजी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांना करण्यात येईल. त्यामुळे, शनिवार, 14 ऑगस्ट 2021 रोजी लसीकरण पुन्हा सुरू होईल.

हेही वाचा -निर्बंधात शिथिलता : मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन; जबाबदारीने वागा, अन्यथा...

ABOUT THE AUTHOR

...view details