मुंबई - सध्या राज्यात लस उपलब्ध नाही, 45 वयोगटावरील नागरिकांना दुसरा डोस देणे सध्या गरजेचे आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबवत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा -तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलची दरवाढ; परभणी, इंदूरसह विविध शहरांमध्ये शतकपार
राज्यातील रुग्णसंख्या कमी होतेय
दरम्यान, 45 वयोगटावरील नागरिकांसाठी लस वापरण्यात येणार आहे. 20 मे नंतर दीड कोटी डोस देणार असे आदर पुनावाला यांनी पंतप्रधान यांना सांगितले आहे. पण ते डोस मिळतील त्यानंतर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री घेतील -
सध्या राज्यात कोरोना रुग्णसंख्या आता कमी होत चालली आहे. 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात मंत्रीमंडळ बैठकीत चर्चा झाली असून, मुख्यमंत्री त्यासंदर्भातला निर्णय घेतील. असे राजेश टोपे यांनी सांगितले.
हेही वाचा -माऊली मातोश्री फाउंडेशनकडून मदतीचा हात; गरजूंना मोफत ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरचा पुरवठा