महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात शनिवारपासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात - लसीकरण लेटेस्ट न्यूज

राज्यात ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाकडून लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित करण्यात आला आहे.

राजेश टोपे
राजेश टोपे

By

Published : Jun 18, 2021, 10:24 PM IST

मुंबई -राज्यात ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाकडून लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित करण्यात आला आहे.

राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान या काळात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून, त्याप्रमाणे शनिवार १९ जूनपासून ३० ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.

'अशी' करता येणार लसीकरणासाठी नोंदणी

शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांनी राज्यातील सर्व आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी यांना याबाबत पत्र पाठविले असून, संबंधित कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

हेही वाचा -आता 14 जुलैपर्यंत मोफत मिळणार शिवभोजन थाळी

ABOUT THE AUTHOR

...view details