मुंबई- मुंबईत आजपासून राज्य सरकारच्या निर्णयाप्रमाणे ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी महापालिकेची लसीकरण केंद्र सज्ज झाली आहेत. ५० टक्के नोंदणी तसेच ५० टक्के वॉकइन पद्धतीने येणाऱ्यांचे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत लसीकरण केले जाणार आहे. केंद्र सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे महापालिका, सरकारी रुग्णालयात हे लसीकरण मोफत केले जाणार आहे.
३० ते ४४ वयोगटातील लसीकरण
योग दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली आहे. मात्र महाराष्ट्र राज्यात लसीचा तुटवडा असल्याने तसेच लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्येही लसीचा नेहमीच तुटवडा जाणवत होता. अनेकवेळा लसीकरण बंद ठेवावे लागले आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून आजपासून (सोमवार) ४५ वर्षावरील नागरिकांसह, ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांचेही लसीकरण केले जात आहे.
३० ते ४४ वयोगटासाठी हे नियम
३० ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड लस बहुतेक केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत दिली जाणार आहे. या वयोगटातील नागरिकांना पहिला डोस दिला जाईल. तसेच ५० टक्के ऑनलाईन नोंदणी व ५० टक्के थेट नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे.
४५ वर्षावरील कर्मचाऱ्यांना हे नियम