महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत शनिवारी 74 हजार 655 लाभार्थ्यांचे लसीकरण - Mumbai Corona Update

मुंबईत काल 74 हजार 655 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 67 हजार 667 लाभार्थ्यांना पहिला तर 6 हजार 988 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 35 लाख 81 हजार 674 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

लसीकरण
लसीकरण

By

Published : Jun 6, 2021, 7:45 AM IST

मुंबई- मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेनुसार सोमवार ते बुधवार वॉक इन पद्धतीने येणाऱ्या तर गुरुवार ते शनिवार नोंदणी पद्धतीने येणाऱ्या 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. काल 74 हजार 655 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 35 लाख 81 हजार 674 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाची आकडेवारी

मुंबईत काल 74 हजार 655 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 67 हजार 667 लाभार्थ्यांना पहिला तर 6 हजार 988 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 35 लाख 81 हजार 674 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 28 लाख 13 हजार 35 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 68 हजार 639 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत आरोग्य कर्मचाऱ्यांना 3 लाख 5 हजार 140, फ्रंटलाईन वर्कर्सला 3 लाख 62 हजार 893, जेष्ठ नागरिकांना 12 लाख 41 हजार 248, 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना 12 लाख 04 हजार 827 तर 18 ते 44 वर्षामधील नागरिकांना 4 लाख 63 हजार 512, 1 हजार 468 स्तनदा मातांचे तसेच देशाबाहेर शिक्षण घेण्यास जाणाऱ्या 2 हजार 586 विद्यार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.

लसीकरण मोहीम

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जाणार आहे. तर गुरुवार ते शनिवार पर्यंत कोविन ऍपवर नोंदणी केलेल्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. कोविन एॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल, तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे. स्तनदा माता आणि गरोदर महिलांचेही लसीकरण केले जाणार आहे.

एकूण लसीकरण

आरोग्य कर्मचारी - 3,05,140
फ्रंटलाईन वर्कर - 3,62,893
जेष्ठ नागरिक - 12,41,248
45 ते 59 वय - 12,04,827
18 तर 44 वय - 4,63,512
स्तनदा माता - 1,468
परदेशी शिक्षण विद्यार्थी - 2,586
एकूण - 35,81,674

हेही वाचा -दिलासादायक : महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 95 टक्के, 3 महिन्यात पहिल्यांदाच सर्वात कमी रुग्ण

ABOUT THE AUTHOR

...view details