राज्यात आज 23 हजार 721 तर आतापर्यंत 5 लाख 36 हजार 197 लसीकरण
राज्यात आज 23 हजार 721 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. राज्यात आतापर्यंत 5 लाख 36 हजार 197 लाभार्थ्याांना कोव्हीशिल्ड लस देण्यात आली.
राज्यात आज 23 हजार 721 तर आतापर्यंत 5 लाख 36 हजार 197 लसीकरण
By
Published : Feb 9, 2021, 10:25 PM IST
मुंबई - राज्यात आज 23 हजार 721 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. आजपर्यंत 5 लाख 36 हजार 197 लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड ही लस देण्यात आली. आज 153 तर आजपर्यंत 5 हजार 020 लाभार्थ्यांना को - वॅक्सिंन ही लस देण्यात आली. अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
राज्यात आज 515 केंद्रांवर 23 हजार 721 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यात 12 हजार 343 आरोग्य कर्मचारी तर 11 हजार 378 फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत 5 लाख 36 हजार 197 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
को-वॅक्सिन लस -
राज्यात सहा ठिकाणी 7 केंद्रांवर को-वॅक्सिन लस देण्यात येत आहे. आज 153 लाभार्थ्यांना को-वॅक्सिन लस देण्यात आली. आतापर्यंत 5 हजार 020 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.