महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत 52 लसीकरण केंद्र बंद, तरीही शुक्रवारी 48,280 लाभार्थ्यांचे लसीकरण - latest news in marathi

मुंबईत शुक्रवारी 52 लसीकरण केंद्र बंद होती. त्यानंतरही 48 हजार 280 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 21 लाख 76 हजार 375 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरण
लसीकरण

By

Published : Apr 24, 2021, 1:21 AM IST

मुंबई -मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण मोठ्या संख्येने होत असल्याने लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. शुक्रवारी मुंबईत 52 लसीकरण केंद्र बंद होती. त्यानंतरही 48 हजार 280 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 21 लाख 76 हजार 375 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत शुक्रवारी 48 हजार 280 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 24 हजार 204 लाभार्थ्यांना पहिला तर 24 हजार 076 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 21 लाख 76 हजार 375 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 18 लाख 38 हजार 593 लाभार्थ्यांना पहिला तर 3 लाख 37 हजार 782 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 72 हजार 843 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 10 हजार 834 फ्रंटलाईन वर्कर, 8 लाख 45 हजार 054 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 7 लाख 47 हजार 644 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 39 हजार 433 तर आतापर्यंत 14 लाख 23 हजार 919 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर शुक्रवारी 6 हजार 419 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 69 हजार 089 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर 2 हजार 428 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 5 लाख 83 हजार 367 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,72,843
फ्रंटलाईन वर्कर - 3,10,843
ज्येष्ठ नागरिक - 8,45,054
45 ते 59 वय - 7,47,644
एकूण - 21,76,375

ABOUT THE AUTHOR

...view details