मुंबई - मुंबईत आज 45 हजार 50 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत एकूण 6 लाख 3 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 20 हजार 192 लाभार्थ्यांना पहिला तर 6 हजार 78 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 26 हजार 270 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.
मागील मार्चपासून कोरोनाचा मुंबईस देशात प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
हेही वाचा-महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट, लस घेतल्यावरही होणार कोरोना - डॉ. राहुल पंडित
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 45 हजार 50 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 37 हजार 348 लाभार्थ्यांना पहिला तर 7 हजार 702 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 6 लाख 3 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 5 लाख 52 हजार 585 लाभार्थ्यांना पहिला तर 76 हजार 415 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 1 लाख 94 हजार 159 आरोग्य कर्मचारी, 1 लाख 30 हजार 954 फ्रंटलाईन वर्कर, 2 लाख 45 हजार 320 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 32 हजार 567 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा-नालासोपाऱ्याच्या लसीकरण केंद्राबाहेर वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू प्रकरण
महापालिकेतील लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 20 हजार 192 लाभार्थ्यांना पहिला तर 6 हजार 78 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 26 हजार 270 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत पालिकेच्या लसीकरण केंद्रात 3 लाख 98 हजार 975 लाभार्थ्यांना पहिला तर 65 हजार 230 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 4 लाख 64 हजार 205 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
हेही वाचा-नांदेड जिल्ह्यात आज 591 नवे कोरोनाग्रस्त
सरकारी रुग्णालयातील लसीकरण -
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 1 हजार 776 लाभार्थ्यांना पहिला तर 430 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 2 हजार 206 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत सरकारी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 17 हजार 204 लाभार्थ्यांना पहिला तर 2 हजार 564 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 19 हजार 768 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
खासगी रुग्णालयातील लसीकरण -
खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावरील आज 15 हजार 389 लाभार्थ्यांना पहिला तर 1 हजार 194 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 16 हजार 574 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आजपर्यंत खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात 1 लाख 10 हजार 406 लाभार्थ्यांना पहिला तर 8 हजार 621 लाभार्थ्यांना दुसरा अशा एकूण 1 लाख 19 हजार 27 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
- आरोग्य कर्मचारी - 1,94,159
- फ्रंटलाईन वर्कर - 1,30,954
- ज्येष्ठ नागरिक - 2,45,320
- 45 ते 59 वय - 32,567
- एकूण - 6,03,000