महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Corona Vaccination : मुंबईत शुक्रवारी 41 हजार 107 लाभार्थ्यांचे लसीकरण - मुंबई कोरोना लसीकरण

मुंबईत शुक्रवारी 41 हजार 107 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 26 लाख 21 हजार 894 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

mumbai vaccination
mumbai vaccination

By

Published : May 8, 2021, 2:36 AM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आज शुक्रवारी 41 हजार 107 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 26 लाख 21 हजार 894 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. दरम्यान लस घेण्यासाठी नागरिकांनी कोविन ऍपवर नोंद केल्यानंतर मोबाईलवर संदेश आला तरच लसीकरणाला यावे असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

लसीकरणाची आकडेवारी -


मुंबईत आज गुरूवारी 41 हजार 107 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 16 हजार 310 लाभार्थ्यांना पहिला तर 24 हजार 797 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 26 लाख 21 हजार 894 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 20 लाख 16 हजार 014 लाभार्थ्यांना पहिला तर 6 लाख 05 हजार 880 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 89 हजार 964 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 40 हजार 257 फ्रंटलाईन वर्कर, 10 लाख 55 हजार 931 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 9 लाख 18 हजार 826 तर 18 ते 44 वर्षामधील 16 हजार 916 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरणाला गर्दी होत असल्याने कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे.

एकूण लसीकरण -


आरोग्य कर्मचारी - 2,89,964
फ्रंटलाईन वर्कर - 3,40,257
जेष्ठ नागरिक - 10,55,931
45 ते 59 वय - 9,18,826
18 तर 44 वय - 16,916
एकूण - 26,21,894

ABOUT THE AUTHOR

...view details