महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत मंगळवारी 39 हजार 522 लाभार्थ्यांचे लसीकरण - लसीकरणाची बातमी

मुंबईत 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी 39 हजार 522 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण 20 लाख 43 हजार 898 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण
लसीकरण

By

Published : Apr 21, 2021, 12:46 AM IST

मुंबई- 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. मंगळवारी मुंबईत 39 हजार 522 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. तर आतापर्यंत एकूण 20 लाख 43 हजार 898 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी
मुंबईत मंगळवारी 39 हजार 522 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 24 हजार 471 लाभार्थ्यांना पहिला तर 10 हजार 051 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 20 लाख 43 हजार 898 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 17 लाख 66 हजार 975 लाभार्थ्यांना पहिला तर 2 लाख 76 हजार 923 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 68 हजार 273 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 2 हजार 275 फ्रंटलाईन वर्कर, 7 लाख 85 हजार 724 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 6 लाख 87 हजार 626 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

असे झाले लसीकरण
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर 26 हजार 545 तर आतापर्यंत 13 लाख 19 हजार 996 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर 5 हजार 484 लाभार्थ्यांना तर एकूण 1 लाख 51 हजार 906 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर 7 हजार 493 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 5 लाख 71 हजार 996 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी - 2,68,273
फ्रंटलाईन वर्कर - 3,02,275
जेष्ठ नागरिक - 7,85,724
45 ते 59 वय - 6,87,626
एकूण - 20,43,898

हेही वाचा -राज्यात 62 हजार 97 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 519 रुग्णांचा मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details