महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत आज 38 हजार 158 लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबईत आज 38 हजार 158 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत एकूण 10 लाख 86 हजार 852 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

Vaccination of 38 thousand 158 beneficiaries in Mumbai today Was done
मुंबईत आज 38 हजार 158 लाभार्थ्यांचे लसीकरण

By

Published : Mar 28, 2021, 2:10 AM IST

मुंबई - शहरात मागील मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. मुंबईत आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील जेष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. आज मुंबईत 38 हजार 158 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. आतापर्यंत एकूण 10 लाख 86 हजार 852 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत आज 38 हजार 158 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यातील 34 हजार 565 लाभार्थ्यांना पहिला तर 3 हजार 593 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 10 लाख 86 हजार 852 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 9 लाख 42 हजार 321 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 44 हजार 531 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 40 हजार 186 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 40 हजार 254 फ्रंटलाईन वर्कर, 5 लाख 16 हजार 415 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 89 हजार 997 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

असे झाले लसीकरण -

मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 20 हजार 713 तर आतापर्यंत 7 लाख 51 हजार 962 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 3 हजार 037 लाभार्थ्यांना तर एकूण 53 हजार 742 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 14 हजार 408 लाभार्थ्यांना तर आतापर्यंत एकूण 2 लाख 81 हजार 148 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

एकूण लसीकरण -

आरोग्य कर्मचारी 2,40,186
फ्रंटलाईन वर्कर 2,40,254
जेष्ठ नागरिक 5,16,415
45 ते 59 वय 89,997
एकूण 10,86,852

ABOUT THE AUTHOR

...view details