मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आज 26 हजार 944 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 24 लाख 54 हजार 141 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. लसीचा साठा मंगळवारी रात्री येणार असल्याने उद्या (बुधवार) 18 ते 44 तसेच 45 वर्षावरील लाभार्थ्यांचेही लसीकरण सुरू राहील, असे पालिकेने कळविले आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज मंगळवारी 26 हजार 944 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 5 हजार 357 लाभार्थ्यांना पहिला तर 21 हजार 587 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 24 लाख 86 हजार 827 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 19 लाख 73 हजार 633 लाभार्थ्यांना पहिला तर 5 लाख 13 हजार 194 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 84 हजार 807 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 29 हजार 141 फ्रंटलाईन वर्कर, 9 लाख 93 हजार 631 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 8 लाख 71 हजार 074 तर 18 ते 44 वर्षामधील 8 हजार 173 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
उद्या लसीकरण सुरू राहणार -