मुंबई :पावणे दोन वर्षाच्या कालावधीत राज्यात कोरोनाच्या (Corona Waves) दोन लाटा आल्या, या दोन्ही लाटा थोपवण्यात राज्य सरकार तसेच मुंबई महापालिकेला (BMC) यश आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि रुग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम (Vaccination Campaign) सुरू आहे. या कालावधीत राज्यात 11 कोटी 20 लाख 17 हजार 541 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.
- 30 तारखेपर्यंत सर्वांना पहिला डोस देण्याचे उद्दीष्ट
आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या लसीचे 12 लाख 94 हजार 272 तर 11 लाख 42 हजार 296 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. फ्रंटलाईन वर्करना पहिल्या लसीचे 21 लाख 47 हजार 739 तर 18 लाख 99 हजार 550 दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 18 ते 44 वयातील 4 कोटी 8 लाख 51 हजार 393 लाभार्थ्यांना लसीचा पहिला तर 1 कोटी 75 लाख 26 हजार 632 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. 45 वर्षावरील 2 कोटी 89 लाख 64 हजार 619 लाभार्थ्यांना लसीचा पहिला तर 1 कोटी 81 लाख 91 हजार 40 लाभार्थ्यांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत सर्व लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दीष्ट सरकारसमोर आहे.
- मुंबईचे टार्गेट पूर्ण -