मुंबई - मुंबईत 37 हजार 120 लाभार्थ्यांना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली. आजतागायत एकूण 9 लाख 39 हजार 188 लाभार्थ्यांना मुंबईत लस देण्यात आली आहे.
मागील मार्चपासून कोरोनाचा मुंबईत प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव कमी होत असताना 16 जानेवारीपासून कोरोनाच्या लढ्यात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत आजगतागायत आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात येत होती. 1 मार्चपासून 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षावरील आजार असलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली.
हेही वाचा-शरद पवारांची प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा; रवीशंकर प्रसाद यांचा टोला
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत आज 37 हजार 120 लाभार्थ्यांना कोरोनाविरोधातील लस देण्यात आली आहे. त्यातील 32 हजार 122 लाभार्थ्यांना पहिला तर 4 हजार 988 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजतागायत एकूण 9 लाख 39 हजार 188 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 8 लाख 9 हजार 276 लाभार्थ्यांना पहिला तर 1 लाख 29 हजार 912 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आजपर्यंत एकूण 2 लाख 25 हजार 902 आरोग्य कर्मचारी, 2 लाख 1 हजार 649 फ्रंटलाईन वर्कर, 4 लाख 40 हजार 844 ज्येष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 70 हजार 793 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
हेही वाचा-'अपनेही जाल में फ---स', राष्ट्रवादीचा फडणवीसांवर निशाणा
असे झाले लसीकरण -
मुंबई महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर आज 21 हजार 899 तर आजपर्यंत 6 लाख 66 हजार 684 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 2 हजार 697 लाभार्थ्यांना तर एकूण 40 हजार 279 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर आज 12 हजार 524 लाभार्थ्यांना तर आजर्यंत एकूण 2 लाख 32 हजार 225 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.
एकूण लसीकरण
आरोग्य कर्मचारी- 2,25,902
फ्रंटलाईन वर्कर- 2,01,649
ज्येष्ठ नागरिक - 4,40,844
45 ते 59 वय - 70,793
एकूण - 9,39,188