मुंबई - गणेश विसर्जन करताना मोठ्या प्रमाणात मूर्ती समुद्रात, नदीत विसर्जन केले जाते. यामुळे पर्यावरणाची हानी होते. यावर उपाय म्हणून आमदार अजय चौधरी अध्यक्ष असलेल्या परळ गाव गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून आम्ही कृत्रिम तलावात विसर्जन केले असून गणेश भक्तांनीही कृत्रिम तलावाचा वापर करावा, असे आवाहन कार्यकर्त्यांनी केले आहे.
परळच्या केईएम रुग्णालयाच्या मागील बाजूस परळ गाव आहे. येथील सीकेपी समाजातील लोकांनी एकत्र येऊन 38 वर्षांपूर्वी शाळेत असताना गणपतीची मूर्ती तयार केली होती. तेव्हापासून आजपर्यंत आम्ही स्व:त हाताने गणेश मूर्ती तयार करतो. आमच्या विभागाचे आमदार अजय चौधरी हे आमच्या परळ गाव गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत. आम्ही सर्व सीकेपी समाजाचे असलो आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असले तरी 38 वर्षांपासून एकाच आकाराची छोटी मूर्ती आम्ही तयार करत असतो, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी यावेळी दिली आहे.