महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ट्रोल केलं तरी रडून मत मागणार नाही - उर्मिला मातोंडकर - hardik patel

'मी अजून नेता झाले नाही. मात्र गेल्या २५ वर्षापासून मी चित्रपटसृष्टीत काम केले. तरीही माझ्यावर सतत टीका केली जात आहे.

ट्रोल केलं तरी रडून मत मागणार नाही - उर्मिला मातोंडकर

By

Published : Apr 8, 2019, 12:03 AM IST

मुंबई - काँग्रेस आयोजित उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात युवा संमेलनात उर्मिलाने प्रथम मराठीतून भाषणाला सुरुवात केली. मला सतत ट्रोल केलं जातंय. मात्र, मी रडून मत मागणार नाही. या देशातील लोक रडून मतांची भीक मागत नाहीत. फक्त साथ मागतात, मला देखील हिच साथ हवी आहे, असे उर्मिला यावेळी म्हणाल्या.

ट्रोल केलं तरी रडून मत मागणार नाही - उर्मिला मातोंडकर


'मी अजून नेता झाले नाही. मात्र गेल्या २५ वर्षापासून मी चित्रपटसृष्टीत काम केले. तरीही माझ्यावर सतत टीका केली जात आहे. तरुण वर्ग हा देशाचा अविभाज्य भाग आहेत.देशाची खरी ताकद ही तरूण आहेत. २०१९ च्या निवडणूकीत भारत कसा असावा, हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. गेल्या ५ वर्षांत सर्वांत जास्त तरुण युवकांना प्रश्नांची उत्तरं हवी आहेत', असेही त्या यावेळी म्हणाल्या.


'आम्हाला सेक्युलर व विकसित देश हवा आहे. एकीकडे 'बेटी बचाव बेटी पढाव'ची घोषणा केली जाते. मात्र, मुलींच्या आरोग्याचे प्रमाण घसरत आहे. या लोकशाहीत स्टार ही देखील एक व्यक्ती आहे, असे उर्मिला यांनी यावेळी म्हटले.

ABOUT THE AUTHOR

...view details