मुंबई - अभिनेत्री कंगणा रनौतने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. राऊत यांनी कंगणाला मुंबई सोडण्यास प्रवृत्त केल्याचे तिने ट्विट केले. यानंतर सिनेतारकांमध्ये ट्विटर वॉर सुरू झालंय. यावर राजकीय पक्षांनी नाराजी व्यक्त केली असून आता विविध सिनेतारकांनीही उडी मारली आहे. कंगणाच्या या ट्विटनंतर आता #मुंबई_मेरी_जान नावाचा हॅशटॅग ट्रेंड करत आहे.
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी तर कंगणाला चांगलंच खडसावलं आहे. महाराष्ट्र हा संपूर्ण देशाचा सांस्कृतिक आणि बौद्धिक चेहरा असून ही छत्रपती शिवाजी महाराजांंची पुण्यभूमी असल्याचे ट्वीट उर्मिलाने केलं आहे. हे सर्व शॉकिंग असल्याचं तिने म्हटलंय.