मुंबई- मुंबई एटीएसकडून करण्यात आलेल्या कारवाईत 2 आरोपींना अटक करत 7 किलो युरेनियम जप्त करण्यात आले होते. यानंतर या संदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला आहे. यासाठी मुंबई एटीएसकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची प्रत राष्ट्रीय तपास यंत्रणेला देण्यात आलेली आहे.
'युरेनियम' प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरू - Mumbai ats seized uranium
मुंबईतील शिवाजीनगर परिसरामध्ये भंगारचा व्यवसाय करणाऱ्या अबू तहीर चौधरी या आरोपीला एटीएसने अटक केली आहे.
!['युरेनियम' प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरू युरेनियम प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून तपास सुरू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10:31:06:1620450066-mh-mum-01-08-nia-7201159-08052021094853-0805f-1620447533-462.jpg)
मुंबईतील शिवाजीनगर परिसरामध्ये भंगारचा व्यवसाय करणाऱ्या अबू तहीर चौधरी या आरोपीला एटीएसने अटक केली आहे. या आरोपीच्या चौकशीनंतर जिगर पांड्या या आरोपीला एटीएसने अटक केली. न्यायालयाने आरोपींना हजर केले असता त्यांची रवानगी 12 मे पर्यंत एटीएस कोठडीत करण्यात आलेली आहे.
तब्बल 25 कोटी रुपयांचा 7 किलो युरेनियम विकण्याचा प्रयत्न जिगर पांड्या याच्याकडून केला जात असताना याबद्दलची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात तपास करण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला बनावट ग्राहक बनून 1 लाख रुपयात या आरोपींकडून काही प्रमाणात युरेनियम एटीएसच्या अधिकाऱ्यांनी मिळवले होते. त्याची तपासणी करण्यासाठी सदरचे युरेनियम भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर येथे पाठवण्यात आले होते. बीएआरसी येथे मिळालेल्या अहवालानंतर हे युरेनियम असून अतिशय घातक असल्याचं समोर आल्यानंतर एटीएस नाही या दोन्ही आरोपींना अटक केली आहे.