मुंबई -प्रियंवदा म्हाडदळकर या इंजिनिअर आहेत. त्यानंतर त्यांनी बेंगलोरमधून एमबीएचे शिक्षण घेतले. जर्मन बँकेत उच्चपदस्त नोकरीवर त्या होत्या. मात्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारतात परत येऊन त्यांनी यूपीएससीचा अभ्यास केला आणि स्वप्न साकार केले. मुंबईच्या प्रियंवदा यांनी दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससी (UPSCupsc Result 2021) परीक्षेत यश मिळवले. त्या राज्यात पहिल्या आल्यात. सध्या त्या हैदराबादमध्ये असतात. देशात त्यांचा १३ वा क्रमांक आला आहे. अभियांत्रिकीची पदवी, एमबीए, जर्मन भाषेचे शिक्षण, जर्मन बँकेत ६ वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी भारतात आयएएस परीक्षेत अवघवीत यश प्राप्त केलं आहे.
प्रियंवदा यांचे (UPSC Topper Priyamvada Mhaddalkar) बालपण मुंबईत गेले. मुंबईतील डी.जी.रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. व्हीजेटीआयमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी घेतली. आयआयएम बेंगलोर येथून एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. या शिक्षणाच्या जोरावर जर्मनीत डॉएश्च बँकेत ६ वर्षे नोकरी केली. या बँकेत असिस्टंट व्हाईस प्रेसिंडेंट या पदावर कार्यरत त्या कार्यरत होत्या. सर्व काही सुरळीत सुरु असताना भारतात परतावे असे वाटले. येथे येऊन युपीएसच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. दुसऱ्याच प्रयत्नात आयएएस झाल्या.