महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे...'; वरळीत झळकले पोस्टर्स - aditya thackeray posters in worli

दरम्यान, 50-50 चा ठराव सेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी झाला होता. तेव्हापासूनच यो दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन अनेकवेळा शाब्दिक कलगीतुरे रंगले होते. आता आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री करण्याच्या पोस्टर्सने पुन्हा एकदा सेनेने भाजपला मुख्यमंत्री पदावरुन डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे' वरळीत झळकले पोस्टर्स

By

Published : Oct 25, 2019, 7:08 PM IST

मुंबई- गुरुवारी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात युतीसह आघाडीलाही चांगले यश मिळाले आहे. या निवडणुकीत ठाकरे घराण्यातील पहिले नवनिर्वाचित आमदार आदित्य ठाकरे हे वरळीतून मोठया मताधिक्याने निवडून आले आहेत. आता मुख्यमंत्री पदाच्या रस्सीखेचला सुरुवात झाली आहे. यात आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी वरळीत 'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे' असे पोस्टर्स लागले आहेत.

'भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे' वरळीत झळकले पोस्टर्स

हेही वाचा -यावेळीही जनतेची 'राजा'ला साथ नाहीच? मनसेला नाकारण्याची ही ५ आहेत कारणे...

दरम्यान, 50-50 चा ठराव सेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी झाला होता. तेव्हापासूनच यो दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन अनेकवेळा शाब्दिक कलगीतुरे रंगले होते. आता आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री करण्याच्या पोस्टर्सने पुन्हा एकदा सेनेने भाजपला मुख्यमंत्री पदावरुन डिवचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा -१४ व्या विधानसभेत महिला आमदारांची संख्या..

वरळी परिसरात आदित्य ठाकरे यांच्या विजयी अभिनंदनाचे पोस्टर झळकले आहेत. यात आमदार आदित्य ठाकरे यांचा 'भावी मुख्यमंत्री' असा उल्लेख पोस्टरमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे या पोस्टरवरून पुन्हा एकदा आदित्य ठाकरेच सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री पदाचा दावा करतील असे संकेत देण्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details