मुंबई -वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'तांडव' या वेबसीरिजचे निर्माते अली अब्बास जफर यांच्या घरी उत्तर प्रदेश पोलिसांची टीम दाखल झाली आहे. या पोलिसांकडून जफर यांच्या घरी नोटीस देण्यात आली आहे. जफर यांना लखनौमध्ये हजर होण्याच्या सूचना नोटीसद्वारे देण्यात आल्या आहे.
अली अब्बास जफर यांच्या घरी यूपी पोलिसांची टीम दाखल 27 जानेवारीला हजर होण्याचे आदेश
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दोन टीम गुरूवारी अली अब्बास जफर यांच्या घरी दाखल झाल्या. या टीमकडून जफर यांच्या घरी पोलिसांनी नोटीस दिली आहे. येत्या 27 जानेवारी रोजी लखनौमध्ये हजर होण्याचे आदेश नोटीसद्वारे देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नोटीस दिली त्या वेळी जफर घरी नव्हते अशी माहिती पोलिसांनी माध्यमांशी बोलताना दिली.
अली अब्बास जफर यांच्या घरी यूपी पोलिसांची टीम दाखल हेही वाचा -'तांडव'वरून तांडव! चार राज्यांचे पोलीस 'तांडव'च्या मागे