मुंबई - 'ए मेरे वतन के लोगों,जरा आंख में भर लो पानी,जो शहीद हुए हैं उनकी,जरा याद करो कुर्बानी'या गाण्याच्या चार ओळी ऐकल्या की अंगावर रोमांच उभे राहतात. देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीचा अंगार फुलतो. मात्र, या गाण्यामागची कथा तुम्हाला माहीत हे का? हे गाणे गाण्यासाठी लता दीदींनी प्रथम नकार दिला होता. मात्र, हे गाणे लोकप्रिय होईल हे त्यांनाही माहित नव्हते. हे गाणे ऐकून पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या डोळ्यात पाणी आले होते. या निमित्ताने या गाण्यामागची कथा जाणून घेऊया...
ऐ मेरे वतन के लोग' हे गाणे 27 जानेवरी 1963 या दिवशी दिल्लीत गायले. 1962 ला भारत चीन युध्दात शहीद झालेल्या जवानांसाठी हे गाणे लिहीले गेले होते. 'ऐ मेरे वतन के लोगो" हे कवी प्रदीप यांनी भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ लिहिले होते. मुंबईतील माहीम समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारताना या गाण्याची प्रेरणा मिळाली. त्याने दुसऱ्या माणसाकडून पेन घेतला आणि त्याच्या सिगारेटच्या पॅकमधून फाडलेल्या फॉइलच्या तुकड्यावर गाण्याचा पहिला शब्द खरडला. काही आठवड्यांनंतर, प्रदीपला निर्माते मेहबूब खान यांनी नवी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमवर होणाऱ्या निधी संकलनासाठी गाणे लिहिण्यासाठी संपर्क साधला. प्रदीपने ही ऑफर स्वीकारली.
हेही वाचा -Journey of Lata Didi About Songs : भारताचा मानबिंदू लतादिदिंचा आवाज शांत झाला! दिदिंचा गाण्यांबद्दल हा प्रवास
ए मेरे वतन के लोगों गाण्याला दिला नकार
'ए मेरे वतन के लोगों' या गाण्याचे शब्द लतादीदींना ते गाण्याची ऑफर दिली होती, दीदींनी ते गाण्यास नकार दिला. कारण लतादीदी त्या वेळी तिच्या बाकीच्या गाण्यांच्या रिहर्सलमध्ये व्यस्त होत्या आणि त्यांच्याकडे वेळ नव्हता. तेव्हा गीतकार प्रदीप यांनी लता दीदींची मनधरणी केली. पण लतादीदींना हे गाणे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी (1963) गाण्यास सांगितले गेले आणि तेव्हा होकार दिला. लतादीदी आपली धाकटी बहीण आशासोबत हे गाणे गाणार होत्या. पण प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी आशाने दिल्लीला जाण्यास नकार दिल्याने त्या एकट्या दिल्लीला गेल्या.
अन नेहरुंच्या डोळ्यात आले पाणी
प्रजासत्ताक दिनानिमित्त तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, दिलीप कुमार, राज कपूर, मेहबूब खान यांसारख्या दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या. संरक्षण मंत्रालयाच्या या कार्यक्रमातून लष्करातील जवानांसाठी निधीही गोळा केला जाणार होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीच्या नॅशनल स्टेडियममध्ये लतादीदींसमोर लोकांची मोठी गर्दी झाली होती. आणि आपल्या आवाजाची जादू पसरवणाऱ्या लतादीदी सर्व काही विसरल्या. आणि हे गाणं मनापासून संगीतकार सी रामचंद्रन यांच्या सुरात गाऊन इतिहास घडवला. नेहरूजींच्या डोळ्यात पाणी आले. लतादीदींनी गाणे संपवल्यावर नेहरूंनी लतादीदींना आपल्याजवळ बोलावले आणि तू खूप छान गायली असे म्हणाले.
हेही वाचा -Lata Mangeshkar Passed Away : लता दीदींवर प्रचंड प्रेम.. मात्र 'या' कारणाने कोल्हापूरकर आणि दीदींच्या नात्यात दरी