महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nawab Malik Arrested : भाजपाच्या दवाबाखाली ईडीचा विनाकारण त्रास; नवाब मलिकांच्या मुलीचा खळबळजनक आरोप - नवाब मलिक ईडी मराठी बातमी

नवाब मलिक यांच्या अटकेनंतर ( Nawab Malik Arrested ) महाराष्ट्रात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आता मलिक यांची मुलगी निलोफर खान हीने खळबळजनक आरोप केले आहेत. ईडीची कारवाई संशयास्पद असल्याचे तिने म्हटले ( Nilofer Khan On ED ) आहे.

Nilofer Khan
Nilofer Khan

By

Published : Feb 24, 2022, 5:07 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली ( Nawab Malik Arrested ) आहे. त्यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय लढाई तीव्र झाली आहे. त्यानंतर आता नवाब मलिक यांची मुलगी निलोफर खान हीने धक्कादायक खुलासे केले आहेत. ईडीची कारवाई संशयास्पद असून, भाजपाच्या दबावाखाली आम्हाला विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप निलोफर खानने ( Nilofer Khan On ED ) केला आहे. या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना निलोफर खान यांनी ईडीचे अधिकारी कधी पोहचले, कशी कारवाई केली याबाबत माहिती दिली. निलोफर म्हणाल्या की, सकाळी सहा वाजले होते. आई नमाजसाठी उठली होती. तेव्हा दरवाजाची बेल वाजली. तिने दरवाजा उघडला असता, ईडीचे अधिकारी बाहेर उभे होते. आम्ही त्यांचे आदरातिथ्य केले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी घराची झाडा झडती घेतली. मग बाबांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी घेऊन आले. माझा भाऊ त्यांच्यासोबत होता.

ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर अधिकाऱ्यांनी बाबांना समन्स देत, सही करण्यास सांगितले. परंतु, त्यांनी नकार दिला. तसेच ही कारवाईची पद्धत कोणती? असा सवाल उपस्थित करत एकप्रकारे जबरदस्ती असल्याचे मलिकांनी अधिकाऱ्यांना म्हटले. हा प्रकार मला कळाल्यानंतर त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तेव्हा बाबांनी विना समन्स प्रश्न - उत्तरे देण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यानंतर आम्हाला रिमांड कॉपी मिळाली, असेही निलोफर खान यांनी म्हटलं.

निलोफर खान प्रसारमाध्यमांशी बोलताना

ईडीचे म्हणणे आहे की, नवाब मलिक महसूलमंत्री होते. मात्र, नवाब मलिक महसूलमंत्री कधीच नव्हते. तसेच, 55 कोटींचा व्यवहार ईडीने तीनशे कोटी केल्याचा आरोपही निलोफर खानने केला. भाजपाकडून आम्हाला त्रास दिला जातोय. मात्र, महाविकास आघाडी सरकार आमच्य पाठीशी भक्कमपणे उभी आहे. हम लढेंगे, जितेंगे भी, असा विश्वासही निलोफर खानने व्यक्त केला.

हेही वाचा -नवाब मलिकांवर कारवाई करण्याचा ठाकरी बाणा मुख्यमंत्री दाखवतील का? - भाजप नेते केशव उपाध्ये

ABOUT THE AUTHOR

...view details