महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bharti Pawar Attack on State Govt : महाराष्ट्रात कोरोना उपाययोजनाचे काम संथगतीने; राज्यमंत्री भारती पवार यांची राज्य सरकारवर टीका

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्यात वाढत असलेल्या कोरोना व ओमायक्रॉन रुग्णांच्या संदर्भात आरोग्य विभागाची विशेष बैठक ( Special meeting of health department on Omicron ) घेतली. या बैठकीला आरोग्य सचिव, त्याचबरोबर आरोग्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज्यामध्ये कोरोना उपाययोजनांचे काम संथगतीने चालू असल्याचं सांगत, त्यांनी राज्य सरकारवर ( Bharti Pawar Attack on State Govt ) टीका केली आहे.

Bharti Pawar Attack on state Govt
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार

By

Published : Jan 4, 2022, 5:34 PM IST

Updated : Jan 4, 2022, 7:47 PM IST

मुंबई -केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात राज्यात वाढत असलेल्या कोरोना व ओमायक्रॉन रुग्णांच्या संदर्भात आरोग्य विभागाची विशेष बैठक ( Special meeting of health department on Omicron ) घेतली. या बैठकीला आरोग्य सचिव, त्याचबरोबर आरोग्य अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज्यामध्ये कोरोना उपाययोजनांचे काम संथगतीने चालू असल्याचं सांगत, त्यांनी राज्य सरकारवर ( Bharti Pawar Attack on State Govt ) टीका केली आहे. त्याचबरोबर केंद्राकडून कुठल्याही राज्याला कोरोना संदर्भामध्ये उपाय योजनेत मेडिकल सुविधा, निधी कमी पडू दिलेला नाही असेही त्या म्हणाल्या आहेत.

आरोग्य विभागाची ओमायक्रॉनवर विशेष बैठक

कोरोना ओमायक्रॉन संदर्भात महत्वाची बैठक -

राज्यात तसेच मुंबई दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना व ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पाहता याची गंभीर दखल आता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी घेतली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या संदर्भामध्ये मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आरोग्य विभागाची विशेष बैठक घेतली. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांचं संपूर्ण देशात याबाबत लक्ष असून ते नेहमी आढावा बैठक घेऊन जातीने लक्ष देत आहेत असंही त्याने सांगितलं. प्रत्येक राज्यांच्या आरोग्य सचिवांबरोबर वारंवार बैठका घेऊन त्यांच्याकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. लसीकरण असेल, विविध मेडिकल साधनसामुग्री असेल, औषध असतील याबाबत केंद्र सरकार कुठेही कमी पडलेल नाही. मेडिकल सुविधांसाठी केंद्राने विशेष पथक निर्माण केल असून पंतप्रधान यांनी सुद्धा ओमायक्रॉन संदर्भात विशेष गाईडलाईन्स बनवण्याचे सांगितल आहे असेही त्या म्हणाल्या.

कोरोना उपाय योजना संदर्भातील निधी अजूनही पडून -

इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र व केरळमध्ये कोरोना व ओमायक्रॉन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सतर्कतेचा इशारा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मुंबईत वाढणाऱ्या रुग्णांची संख्या बघता ही काळजी करण्याची गोष्ट असून जे घराबाहेर पडतात त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे नाही तर ही संख्या अशाच पद्धतीने वाढेल असेही त्यांनी म्हटले आहे. जिथे आवश्यकता असेल तिथे स्थानिक स्तरावर प्रशासन अंतिम निर्णय घेऊ शकतात व त्यांना तसे अधिकार दिले आहेत असेही त्या म्हणाल्या. सर्व राज्यात लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवली जात असून कुठेही लस कमी पडलेल्या नाहीत उलट अतिरिक्त साठा सर्व राज्यांमध्ये लसीचा आजही उपलब्ध आहे असं सांगत राज्यात काम संथ गतीने चालू आहे असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. केंद्राने राज्याला कोरोनावरील उपाय योजना बाबत भरपूर मदत केली असून तो निधी अजूनही पडून आहे असे भारती पवार म्हणाल्या. तर केंद्र सरकारने दिलेला निधी राज्याने का खर्च केला नाही, ते आम्हाला समजणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या. या बैठकीला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ही उपस्थित होणार होते. परंतु, त्यांना महत्वाची बैठक असल्याकारणाने ते या बैठकीला येऊ शकले नाहीत असंही भारती पवार यांनी म्हटलं आहे.

नेत्यांच्या लग्नसमारंभात कोरोना पसरतोय..?

राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे नेत्यांच्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी जमा होताना दिसत आहे, याबाबत भारती पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना सर्वांनी प्रोटोकॉल पाळणे गरजेचे आहे. हा नेते किंवा सामान्य माणूस यांचा विषय नाही आहे. परंतु जबाबदार व्यक्तीने कशा पद्धतीने जबाबदारीने वागायला पाहिजे हे सांगायची गरज नाही. नेत्यांच्या लग्न सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे, हा विषय गंभीर आहे. आता ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या गाईडलाईन्सच पालन सर्वांनी केलं पाहिजे असंही भारती पवार यांनी म्हटलं आहे

हेही वाचा -Decision about Colleges : महाविद्यालय सुरू ठेवायची की बंद याबाबत उद्या निर्णय - मंत्री सामंत

Last Updated : Jan 4, 2022, 7:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details