मुंबई- राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात लसीकरणाला सुरुवात झाली असून आज जे. जे. रुग्णालयात केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी कोरोनाची लस घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालक तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. त्यांच्यासह नोडल अधिकारी ललित संखे हे देखील उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले जीवन जगायची ओळख नस, घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस -
मी आज कोरोनाची लस घेतली आहे. लस अत्यंत सुरक्षित आहे. मला कोणताही त्रास झाला नाही. रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मुंबईमध्ये रुग्ण संख्या दिवसाला दीड हजारच्या घरात आढळत आहे. राज्यात ही संख्या सोळा-सतरा हजाराच्या घरात रोज सापडत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. मोठ्या कार्यक्रमावरती बंदी आणली पाहिजे. प्रत्येकाने मास्क वापरला पाहिजे. सोशल डिस्टंसिंग ठेवलं पाहिजे. तसचं आठवले यांनी आपल्या खास शैलीत लस घेण्याचा सर्वांना आग्रह केला. आठवले म्हणाले की, जीवन जगायची ओळख नस, घ्या सर्वांनी कोविड प्रतिबंधक लस.
हे ही वाचा - VIDEO : नागाशी पंगा पडला महागात.. ४ वेळा दंश केल्याने तरुणाची जीवन-मृत्यूशी झुंज