महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amit Shah Mumbai visit : अमित शहा घेणार लालबागच्या राजाचे दर्शन; दुुपारी भाजप कोअर कमिटीची महत्वाची बैठक - BJP core committee meeting today

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Union Home Minister Amit Shah हे आज सकाळी साडेदहा वाजता लालबागच्या राजाचे दर्शनासाठी Amit Shah visit lalbagh Ganpati जाणार आहेत.

Amit Shah Mumbai visit
अमित शहा

By

Published : Sep 5, 2022, 9:59 AM IST

Updated : Sep 5, 2022, 12:34 PM IST

मुंबई -मुंबईच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Union Home Minister Amit Shah हे आज सकाळी साडेदहा वाजता लालबागच्या राजाचे दर्शनासाठी जाणार आहेत. याप्रसंगी अगोदर ठरवलेल्या दौऱ्यानुसार त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा जाणार होते. पण एकनाथ शिंदे यांनी अचानक त्यांच्यासोबत जाण्यास नकार दिला आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनासमयी अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis हे सुद्धा असणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत जाण्यास नकार दिला ? की सुरक्षेच्या कारणासाठी ते गेले नाहीत, याबाबत अजून तरी संभ्रम असले तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

अमित शहा

दुपारी कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक?लालबागच्या राजाच्या दर्शनानंतर अमित शहा हे वांद्रे पश्चिम येथील भाजप नेते मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या गणपतीच्या दर्शनासाठी जाणार असून त्या नंतर ते पुन्हा दुपारी १२ वाजता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या सागर या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याबरोबरच भाजप कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक Important meeting of BJP core committee सुद्धा तिथे होणार आहे. या बैठकीत राज्यातील प्रमुख भाजप नेते उपस्थित राहणार असून अमित शहा या बैठकीत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. विशेष म्हणजे येणाऱ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भाच्या अनुषंगाने ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. अमित शहा यांचा लालबागच्या राजाच्या दर्शनाचा कार्यक्रम हा दर वर्षीच्या प्रमाणे असला तरी सुद्धा यंदा गणपती बाप्पाच्या दर्शना बरोबरच "मिशन मुंबई" टार्गेट हे अमित शहा यांच्यासाठी असणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या घरी ही भेट!या बैठकीनंतर अमित शहा हे दुपारी सव्वा दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान वर्षा येथे भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहेत व त्यानंतर ते मुंबईतील अंधेरी, पवई येथील नाईक शाळेच्या उद्घाटनाला जाणार असून त्या नंतर ते सायंकाळी सहा वाजता दिल्लीसाठी रवाना होणार आहेत.

हेही वाचा -Amit Shah On Medha Patakar : गुजरातच्या राजकारणात मेधा पाटकरांची एन्ट्री? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले...

Last Updated : Sep 5, 2022, 12:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details