मुंबई -गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah Mumbai Visit Today) यांचे रविवारी मुंबईत आगमन झाले. वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९.४९ वाजताच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले. आज अमित शाह हे मुंबईतील विविध गणेश मंडळांना भेटी देऊन गणारायाचे ते दर्शन घेणार (Amit Shah visit popular Ganesh pandals) आहेत.
अमित शहा यांचे मुंबईत आमगन अमित शाह रविवारी मुंबईत दाखल झाले - यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन,आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठरणार रणनीती - केंद्रीय मंत्री अमित शहा हे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले असले तरी, या दौऱ्या मागे मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महानगरपालिकेवर असलेली सत्ता आहे. त्यामुळे होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी अमिषाचा या दौऱ्यामध्ये खास रणनीती आखली जाणार आहे. यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचे महत्त्वाची बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वात महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील.
अमित शहा यांचे मुंबईत आमगन अमित शहा-मुख्यमंत्री शिंदे बैठक - सध्या शिवसेनेची चारही बाजूने कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता गेल्यास शिवसेनेचे राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. गेल्या काही वर्षापासून उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये असलेला वाद सर्वश्रूत आहे. त्यामुळे या महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांना कडवं आवाहन देण्यासाठी अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांच्यासोबत विशेष रणनीती आखण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हेही वाचा -Amit Shah Mumbai Visit Today : अमित शहा आज मुंबईत; बाप्पाच्या दर्शनानंतर महत्त्वाच्या बैठका!