महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amit Shah visit Lalbaghcha Raja केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लालबागच्या राजाला भेट हा मंडळासाठी अभिमानाचा क्षण, मानस सचिवांची प्रतिक्रिया - Amit Shah visit to Lalbaghcha Raja

मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा Amit Shah visit to Lalbaghcha Raja यांनी भेट दिल्यानंतर लालबागच्या राजाचे मानस सचिव सुधीर साळवी यांनी केंद्रीय गृहमंत्री लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येणं ही गोष्ट मंडळासाठी अतिशय अभिमानाची असून गेले पंधरा वर्ष अमित शहा न चुकता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात अशी प्रतिक्रिया दिली.Union Home Minister Amit Shah visit to Lalbaghcha Raja

Union Home Minister Amit Shah visit to  Raja of Lalbagh
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लालबागच्या राजाला भेट

By

Published : Sep 5, 2022, 4:48 PM IST

Updated : Sep 5, 2022, 5:02 PM IST

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भेट Amit Shah visit to Lalbaghcha Raja दिली. त्यानंतर लालबागच्या राजाचे मानस सचिव सुधीर साळवी यांनी ही गोष्ट मंडळासाठी अतिशय अभिमानाची आहे. गेले पंधरा वर्ष अमित शहा न चुकता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येतात, अशी प्रतिक्रिया दिली. Ganeshotsav 2022

सुधीर साळवी यांनी सांगितले, लालबागचा राजाच्या आशीर्वादासाठी Amit Shah took Lalbagh Raja Darshan अमित शहा आले, हे मंडळासाठी अभिमानाचे क्षण आहेत. खास करून अमित शहा यांनी मीडिया गॅलरीचे कौतुक केले. लालबागचा राजा मंडळाने तयार केलेली मीडिया गॅलरी पाहून अमित शहा यांनी सुधीर साळवी यांच्याकडे याबाबत कौतुक केले. तसेच राजाचे दर्शन घेऊन परतत असताना अमित शहा यांनी दोनदा मागे वळून राजाचे मुखदर्शन घेतले, लालबागच्या राजाच्या दरबारातून अमित शहा यांचा पाय बाहेर पडत नव्हता, असेच काहीच म्हणावं लागेल. Union Home Minister Amit Shah visit to Lalbaghcha Raja

अमित शाह रविवारी मुंबईत दाखल झाले - यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन,आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

रोहित शेट्टींनी घेतली अमित शहांची भेटप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री Union Home Minister अमित शहा यांची मुंबईतील सह्याद्री या गेस्ट हाऊसमध्ये भेट Director Rohit Shetty meets Amit Shah घेतली. या भेटी मागचं कारण अजून स्पष्ट झालं नसलं, तरी सुद्धा अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने त्यांच्याबरोबर ही भेट झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. या भेटीत नक्की काय झालं, याबाबत अजून स्पष्टीकरण समोर आलेलं नाही आहे. अमित शहा मुंबई दौऱ्यावर असल्याकारणाने अनेक भाजप खासदार, नेते अमित शहा यांची भेट घेत आहेत.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठरणार रणनीती - केंद्रीय मंत्री अमित शहा हे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत आले असले तरी, या दौऱ्यामागे मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका हेदेखील एक महत्त्वाचं कारण आहे. शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महानगरपालिकेवर असलेली सत्ता आहे. त्यामुळे होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी अमिषाचा या दौऱ्यामध्ये खास रणनीती आखली जाणार आहे. यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचे महत्त्वाची बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वात महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. Union Minister Amit Shah took Lalbagh Raja Ganapati darshan in Mumbai

हेही वाचाJyeshtha Gauri Pujan : साताऱ्यात पवार कुटुंबीयांनी साकारले गौराईसमोर 'अष्टविनायक देखावा'

Last Updated : Sep 5, 2022, 5:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details