मुंबई :केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा ( Senior BJP Leader Amit Shah Visit to Mumbai ) यांचा उद्या मुंबई दौरा ( Union Minister Amit Shah Visit to Mumbai ) आहे. मात्र, आज रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान अमित शहा मुंबईत दाखल ( Amit Shah Visit on Occasion of Ganapati Darshan ) होणार आहेत. त्यामुळे आज रात्रीसुद्धा अमित शहा काही महत्त्वाच्या बैठका घेण्याची ( Some Important Meetings Tonight ) शक्यता आहे. गणपती दर्शनाच्या निमित्ताने ठेवलेला केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा मुंबई दौरा भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर( BJP of Mumbai ) हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात ( Background of Upcoming Elections of Mumbai BMC ) आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दरवर्षी येतात भेटीला : अमित शहा हे दरवर्षी भाजप नेते आशिष शेलार यांचे वांद्रे पश्चिम येथे असलेल्या गणेशोत्सव मंडळाला भेट देत असतात. तसेच, लालबागचा राजाचे दर्शन अमित शहा हे दरवर्षी घेतात. मात्र, गेली दोन वर्षे कोरोना असल्याकारणाने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला गेला नव्हता. मात्र, या वर्षी निर्बंधमुक्त सण साजरे केला जात असल्यामुळे अमित शाह यांनी गणेश उत्सवादरम्यान हा मुंबई दौरा ठेवला आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठरणार रणनीती :केंद्रीय मंत्री अमित शहा हे बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईत येणार असले तरी, या दौऱ्यामागे मुंबई महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुका हेदेखील एक महत्त्वाचे कारण आहे. शिवसेनेची खरी ताकद ही मुंबई महानगरपालिकेवर असलेली सत्ता आहे. त्यामुळे होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेला सत्तेतून पायउतार करण्यासाठी अमित शहा यांचा या दौऱ्यामध्ये खास रणनीती आखली जाणार आहे. यासाठी उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी सकाळी अकरा वाजताच्या दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीचे महत्त्वाची बैठक ठेवण्यात आली आहे.
बैठकीला भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती: या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वात महत्त्वाचे नेते उपस्थित राहतील. सध्या शिवसेनेचे चारही बाजूने कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेवरची सत्ता गेल्यास शिवसेनेचा राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्षामध्ये असलेला वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे या महानगरपालिकेत उद्धव ठाकरे यांना कडवे आव्हान उपस्थित करण्यासाठी अमित शहा यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातो. या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेऊन मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांच्या सोबत विशेष रणनीती आखण्याची शक्यता नाकारता येत नाही.