महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Amit Shah Mumbai Visit गणेशोत्सवादरम्यान अमित शहा मुंबईत, BMC निवडणुकीसाठी रणनिती तयार - अमित शहा मुंबईत येणार

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा मुंबईचा दौरा करणार Amit Shah Mumbai Visit on 5 September आहेत. 5 सप्टेंबर रोजी अमित शहा यांचा मुंबई दौरा Union Home Minister Amit Shah Mumbai Visit असणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव दरम्यान अमित शहा यांचा मुंबई दौरा असणार Amit Shah Mumbai Ganeshotsav 2022 आहे.

Amit Shah Mumbai
Amit Shah Mumbai

By

Published : Aug 28, 2022, 1:26 PM IST

Updated : Aug 28, 2022, 3:27 PM IST

मुंबई -केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा मुंबईचा दौरा करणार Amit Shah Mumbai Visit on 5 September आहेत. 5 सप्टेंबर रोजी अमित शहा यांचा मुंबई दौरा Union Home Minister Amit Shah Mumbai Visit असणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव दरम्यान अमित शहा यांचा मुंबई दौरा असणार Amit Shah Mumbai Ganeshotsav 2022 असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर अमित शहा यांचा होणारा हा मुंबई दौरा विशेष महत्त्वाचा असणार आहे.

पदाधिकाऱ्यांसोबत बैठकांचे सत्र -मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यादरम्यान काही महत्त्वाच्या बैठका देखील घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांसोबत अमित शहा या दौऱ्यादरम्यान बैठक करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

मुंबई पालिका निवडणुकीच्या दृष्टीने दौरा महत्त्वाचा -अमित शहा दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव दरम्यान मुंबई दौरा करत असतात. यावेळी खास करून ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीला आवर्जून भेट देत असतात. यावेळीही वांद्रे पूर्व गणेश उत्सव मंडळच्या गणपतीचे ते दर्शन घेतील त्यासोबतच लालबागच्या राजाचे दर्शन घेण्याचेही शक्यता आहे. तसेच या वेळी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी खास करून आशिष शेलार यांना देण्यात आली आहे. यासाठीच आशिष शेलार यांना पुन्हा एकदा मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडही करण्यात आली होती. त्यामुळेच मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुक पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

शिवसेना पक्षात मोठी फूट पडली आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना सध्या बॅकफूटवर असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोबतीला घेऊन मुंबई महानगरपालिकेवर असलेला ठाकरे कुटुंबाचा वरचष्मा काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष सरसावला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी देवेंद्र फडणीस यांनी आधीच कार्यकर्त्यांना कार्यक्रम आखून दिलेला आहे. तसेच दिल्ली येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनाही मुंबई महानगरपालिका या वेळी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात हवी आहे. त्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत रणनीती आखण्यात आली असून अमित शहा यांच्या या दौऱ्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आपली कंबर कसली आहे.

Last Updated : Aug 28, 2022, 3:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details