मुंबई -मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातील रेक्लेमेशनजवळ एका भरधाव वाहनाने तीनचाकी ऑटो रिक्षाला धडक देण्याची घटना मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास घडली. यात ऑटो रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू ( Bandra auto rickshaw Accident ) झाला आहे. वांद्रे पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपघात करून पळून गेलेल्या वाहन चालकाचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, वांद्रे रेक्लेमेशन बोगद्यात सी लिंकच्या दिशेने घडली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना फूटपाथवरील ऑटोरिक्षा उजव्या बाजूला चक्काचूर झालेली दिसली. त्यांना लीलावती हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर चालक पडलेला दिसला. असे पोलिसांनी सांगितले. स्थानिक रहिवाशांना विचारल्यानंतर एका अवजड वाहनाने ऑटोरिक्षाला धडक दिली आणि घटनास्थळावरून पळ काढल्याचे पोलिसांना समजले. जखमी महिलेने दुसऱ्या ऑटोरिक्षात बसून घटनास्थळ सोडले.