मुंबई -एकीकडे देशात महागाईपासून ते बेरोजगारांपर्यंत आणि दुसरीकडे केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी वाढल्या आहेत. या सर्वांना लगाम घालण्यासाठी भाजपाविरोधात देशातील विरोधी पक्ष एकत्र येणार ( Non Bjp Chief Minister Meeting ) आहेत. स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( Ncp Leader Sharad Pawar ) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) हे या बैठकीसाठी पुढाकार घेतील. मुंबईत त्याचे नियोजन सुरु झाले असून, लवकरच बैठक होईल, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी दिली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
भाजपाविरोधात देशातील विरोधक एकवटणार - संजय राऊत म्हणाले की, देशात भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव वाढतो आहे. दुसरीकडे महागाई, बेरोजगारी, सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारच्या विरोधात मोट बांधणी करावी लागेल, अशी इच्छा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( CM Mamata Banerjee ) व्यक्त केली होती. देशातील सर्व विरोधकांना बोलवावे, अशी विनंती केली. त्यानुसार मुंबईत बैठक घेण्याचे निश्चित झाले असून, तयारीला सुरुवात झाल्याचे संजय राऊत यांनी ( Non Bjp Cm Meeting In Mumbai ) सांगितले.
राज ठाकरेंवर टीका -महाराष्ट्र शांत असून, काही लोकांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न चालवला आहे. पोलिसांनी सर्व परिस्थिती हाताळली. कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. राम आणि हनुमानाच्या नावाने दंगल घडवण्याचा त्यांचा हेतू होता. नवे हिंदू ओवैसी तयार होत आहेत. पंतप्रधानांनी जातीय तणाव निवळण्यासाठी आवाहन करायला हवे, अशी मागणी राऊत यांनी केली. पंतप्रधानांचे या वातावरणाला समर्थन आहे का?, असा सवालही त्यांनी केला ( Sanjay Raut On Raj Thackeray ) आहे.